Kolhapur news esakal
कोल्हापूर

Kolhapur : विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं...

पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेस प्रारंभ; भंडाऱ्याची उधळण

सकाळ डिजिटल टीम

पट्टणकोडोली : ‘विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला.

आज सकाळी प्रथेपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन करण्यात आले. या तलवारी मिरवणुकीने भानस मंदिर व श्रींचे मंदिरात पूजन करून फरांडेबाबांकडे मार्गस्थ करण्यात आल्या. प्रकाश पाटील, रणजित पाटील, जोशी, आवटे, गावडे, कुलकर्णी, चौगुले आदी मानकरी व धनगर समाज पंचमंडळींनी फरांडेबाबांना भेटून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य केले. या वेळी जमलेल्या लाखो भाविकांनी बाबांच्या अंगावर भंडारा, खारीक-खोबरे, बाळ लोकर यांची उधळण केली. त्‍यानंतर फरांडेबाबांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व तिथे देववाणी केली.

दरम्यान, उबदार कपड्यांची दुकाने, भला मोठा घोंगडी बाजार, ढोल व ढोलांच्या कड्यांचा बाजार यांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सकाळपासून यात्रा परिसरात अनेक ठिकाणी भाविक धनगरी ओव्यांचे कार्यक्रम करीत आहेत; तर फरांडेबाबांच्या गादीसमोर अनेक भक्तगण ढोल व कैताळांचा निनाद करीत होते. यात्रेची गर्दी व कार्यक्रम टिपण्यासाठी १५ हून अधिक ड्रोन कॅमेरे यात्रा परिसरावर फिरत होते. यात्रेतील मुख्य कार्यक्रम आज झाला असला, तरी यात्रेतील धार्मिक विधी अजून दोन दिवस चालणार आहेत.

भंडारा व लोकरीसाठी कापडी पिशव्या

फरांडेबाबांवर उधळणीसाठी भंडारा व लोकर भाविक खरेदी करतात. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात होता. मात्र, चालू वर्षी जवळपास सर्वच विक्रेत्यांनी छोट्या कापडी बटव्याप्रमाणे पिशव्या ठेवल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT