Water bill levy and recovery through spot bill and spot collection 
कोल्हापूर

जागेवरच पाणी बील भरण्याच्या योजनेचा कोल्हापुरातील 28036 कनेक्‍शनधारकांनी घेतला लाभ 

डॅनियल काळे

कोल्हापूर : पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी महानगरपालिकेने स्पॉट बिल आणि स्पॉट कलेक्‍शन हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सुविधेचा लाभ 28हजार 36 कनेक्‍शनधारकांनी लाभ घेतला असून सुमारे रु.5 कोटी 40 लाख 89 हजार 247/- इतकी रक्कम जागेवरच जमा झाली असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 

महानगरपालिकेने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्यासाठी सन 2016 पासून स्पॉट बिल आणि स्पॉट कलेक्‍शन हा महत्वाकांक्षी प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाव्दारे नारिकांना पाणी बिलाची आकारणी करुन प्रत्यक्ष जागेवर छापील बिल देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्यांना नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन बिलाची रक्कम भरणे शक्‍य नाही अशा नागरिकांसाठी जागेवरच बिलाची रक्कम स्वीकारुन त्याची पोहोच पावती देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. 

 तरी शहरातील सर्व नागरिकांना व कोल्हापूर शहर पाणी पुरवठा केंद्रावर अवलंबून असलेल्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरपालिकेच्या स्पॉट बिल आणि स्पॉट कलेक्‍शन नागरी सुविधाकेंद्राकडे बिल भरणे शक्‍य नाही, त्यांनी आपल्या दारामध्ये रिडींग घेण्यासाठी आलेल्या अधिकृत मिटर रिडर्स यांच्याकडे पाणी बिलाची रक्कम जागेवरच भरुन जागेवरच संगणकीकृत पोहोच पावती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. या प्रकल्पामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे. जर एखादा मिटर रिडर पैसे भरुन घेण्यास नकार देत असेल तर त्याच्या विरुध्द पाणी पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करावी. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT