water crown died when eat a fish in rankala lake kolhapur 
कोल्हापूर

पान कावळ्याने मासा गिळला आणि जीवही गमवला

शिवाजी यादव

कोल्हापूर : रंकाळा तलावात पान कावळ्याने मासा गिळला, कावळा पुढे उडत असताना मासे पकडण्याच्या जाळीत अडकला. त्याला जाळीतून सुटण्यासाठी धडपडताना गंभीर जखमी झाला. अशा पान कावळ्यावर वन्यजीव संक्रमन व उपचार केंद्राचे डॉ. संतोष वाळवेकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करून पुढे उपचार ही सुरू केले. मात्र कावळ्याच्या अन्ननलिकेतील जखम इतकी खोल व गंभीर होती की, त्या कावळ्याला पुढे काही खाता येणेही मुश्‍कील झाले. 

उपचार सुरू असतानाच त्याने अखरेचा श्‍वास घेतला. 
रंकाळा तलावावर विविध पक्षी येतात. काही पक्षाचे खाद्य मासे, जीव किटक आहेत. पाणी दलदल भागातील किटक खात पक्षी जगतात, अशात पान कावळ्यांचे थवेच्या थवे या तलावावर विहार  करताना दिसतात. तलावाच्या पाणलोटात मासे पकडण्यासाठी जाळी लावलेली असते. अशीच जाळी लावलेली असताना पान कावळ्याला पाण्यातील मासा दिसला, त्याने पाण्यात सूर मारलाच माशाचे तोंड चोचीतून धरले, मासा गिळण्याचा प्रयत्न केला. मासा मोठ्या आकाराचा असल्याने तो कावळ्याला गिळता येणे मुश्‍कील झाले. त्याची धडपड सुरू झाली. आणि कावळा मासे पकडण्याच्या जाळीत अडकला. 

तशी त्याची धडपड वाढली माशाचे काटे कावळ्याच्या घशात घुसले, कावळा जाळीत अडकल्याने त्याला उडाताही येणे मुश्‍कील झाले. जवळपास दहा पंधरा मिनिटे सुरू असलेली ही धडपड काही पक्षी प्रेमींनी पाहिली. पक्षी प्रेमी होडी व्हल्हवत त्या कावळ्यापर्यंत पोहचले. त्या कावळ्याची त्यांनी जाळीतून सुटका केली. थेट उपचाराला डॉ. वाळवेकर यांच्याकडे घेऊन आले. पान कावळ्याच्या घशात काटे घुसले, धडपडीत पंख दुखावले. त्यांची तपासणी करून डॉ. वाळवेकर यांनी कावळ्यावर पुरक उपचार केले. घशात घुसलेले काटे काढण्यात यश आले. मात्र अन्न नलिकेलाच जखमी तीव्र असल्याने कावळ्याला काही खाता येणे मुश्‍कील झाले. तरीही त्यांनी उपचार सुरू ठेवले. कावळ्याची प्रकृती सुधारेल असे दिसत असताना अचानक त्या कावळ्याने आज प्राण सोडले. 

रंकाळ तलावात मासे मुलबक आहेत. भक्ष्य साधण्यासाठी अनेक पक्षी येथे येतात. त्यांना पहाण्यासाठी पक्षी प्रेमी पर्यटकही येतात. अनेकदा काही दुर्घटनेत पक्षी जखमी होतात. अशा पक्षांना सुरक्षीतपणे शासकीय पशू दवाखाना किंवा वनविभागाकडे वेळीच उपचारासाठी दाखल केले, तर त्याचे प्राण वाचू शकतात. त्यासोबत पक्षांना इजा होईल असे कोणतेही कृत्य तलाव किंवा पक्षांचा अधिवास असलेल्या ठिकाणी करू नये अशी विनंती डॉ. वाळवेकर यांनी केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT