weather update rain forecast Orange alert Kolhapur district till Thursday  Sakal
कोल्हापूर

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळी वाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या गुरुवार (ता. ६) पर्यंत तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागात सुमारे १०० ते २०४ मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असला तरी अन्यत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे. महापालिकेने शिंगणापूर बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्याने सकाळी बंधारा पाण्याखाली गेला.

याची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना देऊन बर्गे तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, पाण्याची पातळी आणि प्रवाह जास्त असल्याने काहीच बर्गे काढण्यात आले; पण बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी बंद झाले आहे.

पाणी कमी झाल्यानंतर उर्वरित बर्गे काढले जाणार आहेत. जोराचा पाऊस झाला आणि पुन्हा पाणी वाढले जाऊन बर्गे काढण्यात अडचणी येऊ शकतील. अशी परिस्थिती आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू राहिला. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाही दमदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.

बर्गे न काढल्याने शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी

ज्या-त्या बंधाऱ्यावरील बर्गे काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महापालिकेने शिंगणापूर बंधाऱ्यावरील बर्गे काढलेले नाहीत. त्यामुळे आज सकाळी हा बंधारा पाण्याखाली गेला. बंधाऱ्यावरून धोकादायकरीत्या वाहतूक सुरू होती.

धरणांच्या पाणीपातळीत वाढ :

धरण - क्षमता (टीएमसीमध्ये) - आजचा साठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी- ८.३६ -२.१२

  • तुळशी- ३.४७-०.८४

  • वारणा-३४.३९-११.३५

  • दूधगंगा-२५.३९ -१.६८

  • कसारी-२.७७-०.६९

  • कडवी-२.५१ -०.८३

  • कुंभी-२.७१-०.९४

  • पाटगाव- ३.७१-०.९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT