What is Jotiba khete
What is Jotiba khete  
कोल्हापूर

रविवारपासून जोतिबा डोंगर दुमदुमणार 

निवास मोटे

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. (पन्हाळा ) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता 16 ) पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी जोतिबाचा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. त्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. 

हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर... 
 

या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सकाळी अभिषेक , सालंकृत महापूजा तसेच धुपारती सोहळा होतो. जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून पारंभ होतो. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील स्वच्छता व इतर कामे पूर्ण केली असून, मंदिरात दर्शन रांगेत जादा गार्डची व्यवस्था केल्याचे देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा व स्वच्छता ही कामे युद्धपातळीवर सुरू ठेवली आहेत असे सरपंच राधा बुणे यांनी सांगितले. डोंगरावरील पोलिस हवालदार एम. एल. पाटील यांनी डोंगरावरील बंदोबस्त नियोजन व इतर यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

जोतिबाचे खेटे म्हणजे काय? 
माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात . या रविवारी भाविक शक्‍यतो अनवाणी पायाने चालत येतात . चांगभलचा अखंड जयघोष होतो. कोल्हापुरातील भाविक तर पंचगंगा नदी ते कुशिरे गायमुख तलाव मार्ग ज्योतिबावर येतात. सांगली, सातारा, बेळगाव ,पुणे मुंबई या भागातील भाविक गायमुख तलाव, पायरी रस्ता, दाक्षिण दरवाजा मार्ग अनवाणी पायाने चालत जोतिबावर येतात 

रविवार अन्‌ व्यायाम 
श्रींच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील पाचशेहून अधिक भाविक दर रविवारी कुशिरे या गावी आपली मोटरसायकल किंवा चारचाकी गाडी लावून डोंगर वाटा या मार्गाने दर्शनासाठी येतात. या वाटेने जाण्यासाठी 50 ते 60 मिनिटे लागतात. दर्शनाच्या निमित्ताने आपल्या आरोग्याचा व्यायाम व्हावा यासाठी हे कोल्हापूरकर नित्यनियमाने डोंगरावर पायी येतात. 

कोल्हापूरकर अन्‌ खेटे यांची परंपरा 
खेट्याच्या निमित्ताने पाच रविवारी अख्ख कोल्हापूर ज्योतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर येते. मध्यरात्रीपासून हातात बॅटरी घेऊन कोल्हापूरकर अनवाणी पायाने डोंगराची वाट चालू लागतात. पंचगंगा नदीत स्नान करून त्यांची ही पदयात्रा सुरू होते. अगदी पहाटेच ही मंडळी डोंगरावर पोचतात. पाच पैकी कोणत्या तरी रविवारी ते पूजाऱ्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य करून ते आपल्या घरी परतात. त्यानंतर ते चैत्र यात्रेलाच गुलाल खोबऱ्यांची उधळण करायलाच येतात. 

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करणार असून, शनिवारी रात्रीच डोंगरावर पोलिसांचा फौजफाटा ठेवणार आहे. डोंगरावर पहाटे दरवाजा उघडताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचा दंगा, वाईट वर्तन करू नये. सर्व भाविकांना श्रींचे दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न राहील. खेटे यात्रेचा आनंद घ्या; पण कोणी गैरवर्तन केल्यास त्यांना पोलीसी खाक्‍या दाखवणार आहोत . 
- अनिल कदम, डी.वाय.एस.पी. शाहुवाडी विभाग 

आमच कुलदैवत जोतिबा. आम्ही दर रविवारी दर्शनासाठी डोंगरावर जातो. खेटे जवळ आले की आम्हास आनंद होतो .पहाटे जोतिबा कोल्हापूर रस्ता गर्दीने फुलतो. या यात्रेचा आनंद इतरांनीही घ्यावा. 
- सत्यजीत खाडे, भाविक, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT