whatsapp message of hunger for three days kolhapur marathi news 
कोल्हापूर

जगात भारी कोल्हापूरी 'आपली माणस' आली दारी....

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर  : "आपली माणंस' या व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर ते तीसजण तीन दिवस उपाशी असल्याचा मॅसेज आला. तो खरा आहे, खोटा आहे, हे पाहण्यासाठी मॅसेज टाकणाऱ्या महेंद्र कवाळेंना फोन केला. त्यांनी वस्तूस्थिती सांगितली. साधारण सातच्या सुमारासह हे सर्व घडले. आणि साडेनऊच्या सुमारास त्या तीस बिहारी कामगारांना गरमागरम जेवन पोच झाले. तीन दिवस केवळ बिस्टक आणि पाण्यावर असलेल्या या कामगारांनी कोल्हापूरकरांचे शतशः आभार मानले.

एकंदरीतच "आपली माणसं' या व्हॉटस्‌ ऍपवरील ग्रुपने तीस जणांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. यासाठी स्वप्नील पार्टे आणि इर्षाद बंडवल यांनी ही व्यवस्था केली. 

व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर आला एक मेेसज अन्

गुरुवार (ता.2) सायंकाळी पाचच्या सुमारास एका कार्यकर्त्यांच्या व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर राजारामपुरीतील काही कामगार उपाशी असल्याचा मॅसेज फिरत होता. त्याकडे कोणीही गांभिर्याने पाहिले नाही. पुन्हा हाच मॅसेज "आपली माणसं' या व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर पुन्हा धडकला. तो खरा की खोटा हे पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील स्वप्नील पार्टे यांनी मॅसेज टाकणाऱ्या महेंद्र कवाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वस्तूस्थिती सांगितली. तसेच ओमप्रकाश या कामगाराचाही मोबाइल क्रमांक दिला. यानंतर पार्टे यांनी ओमप्रकाश यांच्याशी संपर्क साधाला. तेंव्हा उत्तर प्रदेश, बनारस अशा वेगवेगळ्या ठिकाणहून तीस कामगार कोल्हापुरात कामसाठी आले आहेत.

भुकावलेल्यांना पोटभर जेवन​

गेली तीन दिवस ते जेवले नाहीत. केवळ बिस्टीक आणि चहाच पित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साधारण सायंकाळचे सात वाजले होते. तेंव्हाच पार्टे यांनी नऊपर्यत जेवन घेऊन येत असल्याचे सांगितले. केवळ दोन तासांत तीस जणांचे जेवन कसे तयार करायचा हा प्रश्‍न होता. त्यामुळे पार्टे यांनी शासकीय कर्मचारी, सीपीआर मधील कर्मचाऱ्यांना जेवन देणारे इर्षाद बंडवल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दीड-दोन तासांत भात, आमटी, भाजी देण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. नऊच्या सुमारास जेवन तयार झाले. पंधरा-वीस मिनिटांत राजारापुरीतील पंत बाळकुंद्रे मंदिराच्या मागे राहत असलेल्या तीस कामगारांना गरमागरम जेवन देण्यात आले. तीन दिवस भुकावलेल्यांना पोटभर जेवन मिळाल्यावर न कळत त्यांच्या तोंडून कोल्हापूरकरांना धन्यवाद ! असे शब्द आले. 

नफा ना तोटा
 
उत्तरप्रदेश, बनारस परिसरातील हे कामगार दिवसांतून एकदाच रात्री जेवतात. त्यांना दुसऱ्या दिवशीही जेवन दिली आहे. याचबरोबर पंधरा दिवस पुरेल इतके रेशन साहित्य सुद्धा आज देण्यात आले आहे. किराणामाल दुकानदारांनीही हे साहित्य ना नफा ना तोटा असे दिले आहे. आता पुढील पंधरा दिवस कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. 
स्वप्नील पार्टे मंगळवार पेठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT