उतूर : आरदाळ (ता. आजरा) येथे माजी सरपंच संपतराव देसाई व नेताजी पाटील यांच्या घराच्या मागे आढळलेला शेकरु सायंकाळपासून दिशेनासा झाला. याबाबत वृत प्रसिद्ध झाल्यावर या शेकरू पाहण्यासाठी प्राणी मित्रांनी या ठिकाणी जावून माहीती घेतली. मात्र, त्याचा नेमका ठावठिकाण लागला नाही.
अतिशय देखणा आणि सह्याद्रीच्या दाट झाडीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणारा हा प्राणी आंबोली व आजरा तालूक्यात कासारकांडगाव या जंगलात आढळला होता.
वडकशेवाले वझरे जंगलात तो गेल्याची शक्यता खोराटे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या दुर्मिळ प्राण्याची संपूर्ण काळजी पाटील व देसाई परिवाराने घेतली. त्याला खायला अन्न म्हणून फणसाचे गरे व पाण्याची व्यवस्था केली. भटकी कुत्री किंवा कावळ्याचा त्रास होवू नये म्हणून ते दिवसभर लक्ष ठेवून होते.
याबाबात वनरक्षक नागेश खोराटे म्हणाले,""शेकरूला थंड हवा व दाट जंगल लागते. यामुळे या परिसरात तो जास्त राहणार नाही. आपल्या देशात शेकरूच्या साधारणतः सात उपजाती आढळतात. तो अगदी ऊंचच ऊंच झाडांच्या शेंड्यांवर राहणे पसंत करतो. शक्यतो झाडावरुन जमिनीवर येणाचे हे टाळतात. एका झाडावरुन दुसऱ्या झाडाकडे उड्या मारत जाण्याच्या त्यांच्या सवयीने लोकं शेकरुला उडती खार समजतात.
शेकारूची शरीरयष्टी मजेशीर असते. मस्तपैकी लांब पाय नी तोल सांभाळण्यासाठी मिळालेली दोन फुट लांब झुपकेदार शेपुट यांना उड्या मारण्यासाठी उपयोगी ठरते. राखाडी, काळासर रंगाच असलेलं त्याचं शरीर तस पाहायला गेलं तर मस्त गबदुल याच सदरात मोडतं. पोटाकडे फिक्कट रंग नी त्याच रंगाची शेपटी असलेलेली नी सकाळ संध्याकाळच्या सुमारास अगदी उत्साहाने उड्या मारणारा हा प्राणी दुपारी मस्तपैकी विश्रांती घेतो.
विश्रांती म्हणजे, पोटोबा फांदीवर टेकवायचा नी हातपाय व शेपुट फांदीवरुन खाली लूज सोडुन चक्क झोपायचं. शेकरूची सवय म्हणजे एकच घर बांधुन स्वस्थ न बसता जवळपासच्या झाडांवर ते सहा सात घरटी बांधुन ठेवतात. आलटुनपालटुन त्यातले एकेक घरटे ते दुपारच्या आणि रात्री झोपण्यासाठी, पिल्लांना मोठं करण्यासाठी वापरतात. कधीकधी मांजरासारखंच ते आपल्या पिल्लांना एका झाडावरुन दुसर्या झाडावर सुरक्षीततेसाठी हलवतात. ही घरटी आकाराने मोठी असली तरीही ऊंच अशा झाडावर अगदी बारीक फाद्यांवर बांधलेली असतात म्हणुनच सुरक्षित असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.