Whisked 44 worlds matched 
कोल्हापूर

वा क्या बात है! त्यांच्यामुळे जुळले लाॅकडाऊनमध्ये विस्कटलेले तब्बल एवढे संसार

राजेश मोरे

कोल्हापूर : एकमेकांना समजून घ्या, थोडा धीर धरा, परिस्थितीचा सामना करा, उद्याचा दिवस तुमचा आहे, अशी ऊर्जा निर्माण करणारे समुपदेशन महिला तक्रार निवारण कक्षातर्फे केले जाते. कोरोनाच्या काळात घरगुती तंटे मिटवून 44 संसाराची घडी बसविण्याचे यशस्वी कार्य कक्षातर्फे झाले आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सासरच्या मंडळीकडून छळ होतोय, हुंड्याची मागणी होतेय, संशयावरून जाच होतो, अशा तक्रारी पोलिस मुख्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाला नव्या नाहीत. आता लॉकडाउनमुळे संसारात खटके उडण्याची अनेक नवी कारणे पुढे येत आहेत. लॉकडाउनमुळे सर्वच मंडळी घरात आहेत. त्यात पुरुष मंडळींच्या हाताला काम नसल्याने त्यांचीही चिडचीड सुरू आहे. कुटुंबात पैशाची चणचण सुरू झाली. तसा कौटुंबिक कलह निर्माण होऊ लागला. तशा कौटुंबिक वादाच्या तक्रारीही वाढू लागल्या. या तक्रारीतून सुखी संसार मोडतात की काय? अशी भीती निर्माण होऊ लागली. काहीशा संवदेशनील काळात पोलिस मुख्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाकडून संबंधितांचे समुदेशन वेगळ्या पद्धतीने केले जात आहे.

नोकरी व्यवसाय नसल्याने आर्थिक कारणातून कौटुंबिक कलह निर्माण झाला का? याचा अभ्यास कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अग्रक्रमाने घेतला जातो. अशा कुटुंबांना बोलवून त्यांच्या मनातील कटुता काढली जाते. त्यानंतर अशा कुटुंबांना "कोरोना परिस्थिती कायम राहणार नाही. एकमेकांना समजून घ्या, थोडा धीर धरा, एकमेकांच्या साथीने परिस्थितीचा सामना करा, परिस्थितीवर तुम्ही निश्‍चित विजय मिळवाल.' असा आत्मविश्‍वास निर्माण करणारे समुपदेशन येथे केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra ST concession: प्रवासी कार्डद्वारेच ऑक्टाेबरपासून सवलत ; एसटीकडून क्यूआर कोड पावती महिनाभर ग्राह्य धरणार

दुबईत सोन्याचं एटीएम लावणारा अशर्फी सेठ कोण होता? दाऊदला ‘डॉन’ बनवण्यात होती मोठी भूमिका

ममता कुलकर्णीचा पुन्हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? ९०च्या गाण्यांवर धरला ठेका, Viral Video

Google's Birthday: गुगलचा २८वा बर्थडे! होमपेजवर दिसलं खास Doodle; काय आहे यामागची गोष्ट?

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची : नितेश राणे

SCROLL FOR NEXT