Who was hit by the Congress Young Brigade in municpalcorporation 
कोल्हापूर

कॉंग्रेसच्या यंग ब्रिगेडचा फटका कोणाला?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी तरुण चेहऱ्यांना संधी देण्यावर कॉंग्रेसचा भर राहणार आहे. तसे झाल्यास याचा फटका वर्षानुवर्षे घरात उमेदवारी असणाऱ्यांना बसणार आहे. "मिशन यंग' ब्रिगेडचा फटका कोणाकोणाला बसतो? याकडे लक्ष लागून राहिले आहे. मी एका प्रभागात आणि मुलगा लगतच्या प्रभागात अशी स्वप्ने पाहणाऱ्यांना केवळ एकाच प्रभागातून संधी दिली जाईल. 
महापालिकेत अनेक वर्षापासून निवडून येणारे नगरसेवक पाहता पहिल्यांदा वडील नंतर मुलगा, आणि सून यांच्यापुरते पद मर्यादित राहिले आहे. अर्थात त्या मागे संबंधित घराण्याने वर्षानुवर्षे प्रभागात केलेली कामे आणि संपर्काची शिदोरी असते. या निवडणुकीत काही पारंपरिक चेहऱ्यांना संधी देताना तरुण चेहरे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करणार आहे. विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवता पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत मंत्री पाटील यांना महापालिकेतील संख्याबळ कामी आले. 
81 पैकी 48 सदस्य पाटील यांच्या पाठीशी राहिले. यात राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या सदस्यांचा समावेश होता. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस जास्तीत जास्त जागांवर उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. किमान 40 जागांचे कॉंग्रेसचे लक्ष्य आहे. 
निवडणुकीच्या निमित्ताने भागाभागांत नवे कार्यकर्ते तयार झाले आहेत. जुनी मंडळी होती, त्यांचा तसेच सध्याच्या मतदारांचा "जनरेशन गॅप' मोठ्या प्रमाणावर पडला आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जुन्या मंडळींनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, अशी यामागे धारणा आहे. ठराविक घराण्यापुरतीच उमेदवारी ही ओळख मोडून काढण्याचा कॉंग्रेस पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहे. आपण एखाद्या प्रभागातून सातत्याने निवडून येतो याचा अर्थ आपली मक्तेदारी आहे आणि एका प्रभागातून आपण स्वतः आणि लगतच्या प्रभागातून मुलाला संधी देण्याचे स्वप्न काहीजण पाहत आहे. त्यास कॉंग्रेसचा विरोध असून केवळ एका प्रभागातून एकालाच संधी दिली जाईल. 


कॉंग्रेसचे उमेदवार निश्‍चित करताना तरुण चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न राहील. जुन्या जाणती मंडळी सोबत असतील पण त्याच त्या चेहऱ्यांना लोक कंटाळले असतील तर तरुणांचा निश्‍चितपणे विचार केला जाईल. 
सतेज पाटील, पालकमंत्री, तथा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

Latest Marathi News Live Update : मंत्री गोगावले यांचा राज ठाकरे यांना पलटवार; “उद्धव ठाकरेंसोबत जाणं ही सत्तेसाठीची लाचारी नाही का?”

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद , जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT