Why despair of "hope" fighting against Corona 
कोल्हापूर

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या "आशां'ची का करता निराशा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  ः कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्याची माहिती घेण्यासाठी आशा कर्मचारी अपार्टमेंटच्या खाली गेली की तिला पहिली सूचना मिळते,""लिफ्टमधून नको, जिन्यावरून जा.'' चार मजले चढून वर गेले की, ""तुम्हाला कोणी आत सोडले, कशासाठी आलाय'' अशा संशयभऱ्या प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होते. कोणी म्हणतं "घरात कोण नाही, नंतर या', कोणीतरी खिडकीच्या फटीतूनच माहिती सांगते. त्यातही दरवाजाला हात लावू नका, गेटला स्पर्श करू नका, भिंतीला टेकू नका, अशा सूचना सतत देत राहतात. अशा नकारात्मक प्रतिसादासोबतच आशा कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणुकीचे प्रकार सर्व ठिकाणी नाही परंतु काही ठिकाणी ठळकपणे सहन करावे लागत आहेत.

एखादी व्यक्ती परजिल्ह्यातून, परराज्यातून किंवा परदेशातून गावात आली असेल तर त्या व्यक्तीची माहिती शासनाला कळवण्याची जबाबदारी आशांकडे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कुटुंबाचा रोष आशांना सहन करावा लागतो. क्वारंटाईन व्हायचे नसल्याने तिला शिवीगाळ करण्याचे प्रसंगही काही ठिकाणी घडले आहेत. म्हसवे (ता. भुदरगड), उचत व सरूड (ता. शाहुवाडी) येथील आशा कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू नये यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो, असे अनुभव काही आशांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित करणे, आरोग्यसेतू ऍप डाऊनलोड करायला सांगणे, रेडझोनमधून आल्यास क्वॉरंटाईनचे शिक्के मारणे असे काम आशांना करावे लागत आहे. सीमावर्ती भागातील आशांना या कामासोबतच चेकपोस्टवर आठ तासांची ड्युटी करावी लागत आहे. सर्व्हे करताना काही ठिकाणी माहिती न देताच त्यांना माघारी परत पाठवल्याने आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेली माहिती संकलन करताना अडचणी येत आहेत. तर एकाच माहितीसाठी चार चार वेळा हेलपाटेही मारण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. 


सर्व्हे करताना आशांना काही ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळते. काही ठिकाणी शिवीगाळ करणे, मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. ज्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आशा कर्मचारी झटत आहेत त्यांनाच रोष पत्करावा लागत आहे. 
- नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्षा, राज्य आशा व गटप्रवर्तंक कर्मचारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT