wife dead after husband death 
कोल्हापूर

पतीच्या मुत्यृनंतर अवघ्या पाचव्या दिवशीच पत्नी...  

धनाजी पाटील

पुनाळ (कोल्हापूर) - पती निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या पाचव्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली. येथील शिवाजी सदाशिव पाटील (वय 45) यांचे मंगळवारी (ता. 18 ) निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 20) झाले.

पतीच्या निधनाचा धक्का लता शिवाजी पाटील (वय 38) यांना बसला. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने लता यांना खासगी दवाखान्यात हलवले; पण नियतीच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता. मानसिक धक्‍क्‍यामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने लता यांना माहेरी पणुत्रे (ता. पन्हाळा) येथे आणले. मुलगा राहुल व मुलगी सुवर्णा आईला पाहायला पणुत्रे येथे गेले होते. मुलगा व मुलीचा आवाज कानावर पडताच लता यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. आणि त्यांना प्राण सोडला. शानिवारी (ता. 22) दुपारी अडीच-तीनची वेळ काळ बनून आली. वडिलांचे मृत्युचे दुःख पचवायची ताकद नसलेल्या राहुलवर आईचे दुःख पचवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लता यांचे रक्षाविसर्जन सोमवारी (ता. 24) आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; महिला शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Latest Marathi News Live Update : जगातील सर्वात मोठ्या जगदंबा तलवारीच्या प्रतिकृतीचं राम कदम यांच्या हस्ते लोकार्पण

Motor Accident: केडगाव चौफुला रस्त्यावर मोटार ओढ्यात कोसळून युवकाचा दु:खद मृत्यू

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT