The wife fled when her husband was diagnosed with coronary infection. 
कोल्हापूर

हनीमूनला गेल्यावर पतीला झाला कोरोना ; हे समजताच नववधू गेली पळून...

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - येथील अभियंत्याचे नुकतेच लग्न झाल्यानंतर हे जोडपे हनीमूनसाठी ग्रीस येथे गेले होते. पण, विदेश फिरून येताना पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. देशात परत आल्यावर पतीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान स्पष्ट झाल्यावर नववधूने पतीची लागण आपल्याला होईल, या भीतीने आग्रयाला पलायन केले. राज्यातील अधिकाऱ्यांनी तिचा शोध घेतल्यानंतर तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पतीची प्रकृती आता सुधारली असल्याचे सांगण्यात आले.

धास्ती घेऊन नववधूने काढला पळ

याबाबत माहिती अशी - एका प्रतिष्ठीत कंपनीत अभियंता असलेल्या तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यानंतर अलीकडेच हे जोडपे हनीमूनसाठी ग्रीसला गेले होते. त्यानंतर ते बंगळूरला परतले. येथे परदेशातून आलेल्यांच्या तपासणीत अभियंत्याला कोरोना व्हायरस चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्यावर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू करण्यात आले याप्रकरणाची धास्ती घेऊन नववधूने पळ काढला. त्यामुळे अधिकाऱ्यांत गोंधळ उडाला. अखेर तिचा आग्रा येथील निवासस्थानी शोध घेण्यात आला. तिची तपासणी केली असता तिलाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

अधिकाऱ्यांनी गाठले आग्रा

महिला आग्रा येथे गेली असल्याचे समजताच बंगळूरच्या अधिकाऱ्यांनी लगेच उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले होते. नंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेच्या आग्रा येथील घरास भेट दिली. तथापि, महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी तपासणीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथील पोलिसांना बोलावले आणि एका स्वतंत्र खोलीत त्या महिलेची तपासणी केली. त्यात तिलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT