Wildlife survival increasingly dangerous jyotiba temple kolhapur marathi news
Wildlife survival increasingly dangerous jyotiba temple kolhapur marathi news 
कोल्हापूर

 मोर, लांडोर, ससा, साळिंदर, भेकर, त्यापासून होत आहेत चार हात लांब  ; दिवसेंदिवस अस्तित्व धोकादायकच

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर):  पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की घनदाट जंगल , हिरवागार परिसर, वेड्यावाकड्या वळणांची हिरवीगार पठारे आणि जैवविविधता आणि पशु पक्षी यांचा खजिनाच लाभला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या वनौषधी आहेत. ज्याचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनात होतो.  शिवाय जंगलातील लहानसहान  जीवजंतू यांना देखील हा मोठा आधार असतो. मात्र आता पक्षांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगर पोहाळे तर्फ आळते सादळे मादळे गिरोली दाणेवाडी या भागातील डोंगर पठारावर सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी गेल्या ४० वर्षांपासून एकसूरी पद्धतीने विदेशी वृक्षांची बेसुमार वृक्ष लागवड केल्यामुळे मोर, लांडोर, ससा, साळिंदर, भेकर, कोल्हा तसेच विविध जातीचे पक्षी यांचे अस्तित्वच नष्ट होऊ लागल्याचे चित्र या भागात दिसून लागले आहे.

सध्या तर वानर या प्राण्याने आपली निवासस्थाने मानवी वस्तीच्या भागातच वसवली  आहेत . त्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्गास बांधावरची झाडे तोडून टाकण्याची वेळ आली आहे. वानरानी सध्या कौलारू घरे, स्लॅब या ठिकणी अतिक्रम केल्याने त्यांचा सर्व सामान्यांना त्रास होऊ लागला आहे. वन्यजीव तसेच पशुपक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग ,
वन विभाग यांनी जी विदेशी वृक्ष लावली आहेत. ती तोडून त्या ठिकाणी या पशुपक्षी प्राण्यांना उपयुक्त अशी देशी असणारी झाडे जांभूळ, लिंबू, चिंच, वड, पिंपळ, शिरीष  यांची लागवड केल्यास या वृक्षांचे जतन होईल. या विदेशी वनस्पतीवर कोणताही पशुपक्षी बसत नाही. प्राणी त्यापासून चार हात लांब असतात. त्यामुळे ही झाडे आता कायमची नष्ट करून देशी झाडे लावणे फार गरजेचे आहे. तरच ही जैवविविधता व वन्यजीव पक्षी वैभव टिकेल.

जोतिबा पोहाळे या भागात आहेत या विदेशी वनस्पती 

गिरीपुष्प (ग्लिरीसिडीया ), ऑस्ट्रेलियन बाभूळ,
निलगिरी , गुलमोहर , रानमोडी.

ही देशी झाडे लावा व जगवा

 जांभूळ , आंबा, चिंच अर्जुना बेहरडा , शिरीष , काटे बाभूळ, वड, पिंपळ, उंबर, कडूनिंब, भोकर


या भागात हे आहेत पक्षी .

खंडया, सातभाई , पोपट सुगरण , वेडा राघू ,टिटवी , साळुंखी, स्वर्गीय नर्तक , राखी धनेश , बुलबुल , भारद्वाज , बहिरी ससा , घुबड , गाय बगळे , नाचन,खाटीक , सुर्यपक्षी यासह ११० प्रकारचे पक्षी आहेत .

या प्राण्यांचा अधिवास

ससे , रानमांजर , कोल्हा , साळींदर , घोरपड , रानडुक्कर , गवे, बिबटया , वानर,इजाट, विविध जातीचे सर्प


सामाजीक वनीकरण , स्थानिक स्वराज्य संस्था व वनविभागाने विदेशी वनस्पतींच्या नवीन रोपांची निर्मीती तसेच लागवड  थांबवण्याची फार गरज आहे  विदेशी झाडांची लागवड  थांबवून त्या ठिकाणी नव्याने या भागातील  जैवविविधतेस अनुकूल असणारी देशी झाडे लावणे गरजेचे आहे. तरच येथील स्थानिक वन्यजीवांचा आदीवास टिकून राहील . 

सुरेश बेनाडे निसर्ग मित्र,पोहाळे तर्फ आळते तालुका पन्हाळा

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT