चंद्रकांत पाटील sakal
कोल्हापूर

सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीसाठी प्रयत्न करणार-चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांची ग्वाही, मिरजकर तिकटी येथे आंदोलनाला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: येथील रंगकर्मी आंदोलनातर्फे आज मिरजकर तिकटी येथे सांस्कृतिक कला बाजार मांडण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली. यावेळी बाबा पार्टे, जयकुमार शिंदे यांनीही कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा दिला.

मिरजकर तिकटीनंतर संभाजी नगर येथील संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपती समोर विविध कलाविष्कार सादर झाले. यावेळी झंकार सुतार, रवी सुतार, महेश सोनुले, वेदा सोनुले, सुरज नाईक, दिनेश माळी, नितीन सोनटक्के, मंजिरी दोडन्नावर,रणजित बुगले यांनी गीते सादर केली. त्यांना भार्गव कांबळे, गौतम राजहंस, अनिकेत ससाणे यांनी साथसंगत केली. श्रद्धा शुक्ल आणि सागर बगाडे यांनी गोंधळ नृत्य केले.

भर पावसात या कलाकारांनी आपली कला सादर केली. मुकुंद सुतार, सुनिल घोरपडे, प्रसाद जमदग्नी धनंजय पाटील, रोहन घोरपडे, मनोज जोशी, समीर भोरे, अजय खाडे यांनी नियोजन केले. श्रीधर जाधव, रमेश सुतार, शेखर गुळवणी यांनी ध्वनी व्यवस्था केली. दरम्यान, उद्या (रविवारी) अकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आणि साडेबाराला कसबा बावडा येथील भगवा चौकात आंदोलन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Wagholi Accident : पुण्यातील वाघोलीत कार अन् ट्रकचा भीषण अपघात; तीन तरूणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

IND vs NZ 1st Test: १५ षटकं शिल्लक असताना 'ड्रॉ' निकाल मान्य का केला? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं? शुभमन गिलने मॅचनंतर सर्व सांगितलं, म्हणाला...

Parner Water Scarcity: पारनेरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; ४१ हजार नागरिकांची तहान १९ टँकरवर, आणखी सहा गावांची मागणी

Latest Marathi News Live Update: ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस उत्पादक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Solapur News: अयोध्येच्या धर्तीवर सोलापूरच्या बेलाटीत भव्य राम मंदिर; तीन कोटींचा प्रकल्प आकाराला

SCROLL FOR NEXT