the winners celebrated firing in the air The incident took place in Kolhapur 
कोल्हापूर

व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याने मामाने चक्क हवेतच गोळीबार करत आनंद साजरा केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरात घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

भाचा ५० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकला. या आनंदात मित्रमंडळींसोबत घरासमोरील पटांगणात मामांनी  हवेत गोळीबार करत जल्लोष केला तर इतरांनी ही यावर टाळ्या वाजवत दाद दिली. एकदा दोनदा नव्हे तर चारवेळा हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे गावातील लोकही घाबरून गेले. अनेकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. या हवेत गोळीबार करतानाचे चित्रीकरणही असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही होत असून पोलीस काय कारवाई करतात ? याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Kagal Video : कागलला उरुसात जायंट व्हील पाळण्यात नागरिक अडकले, तब्बल २ तासांचा थरार; पाळणा लॉक झाला अन्

Pune Crime : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची गळा आवळून हत्या; महापालिका निवडणूक लढवण्याची सुरू होती तयारी

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी नोव्हेंबरमध्ये कर्नाटक दौऱ्यावर; नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर वाढले औत्सुक्य

Maharashtra Weather Updates : ऑक्टोबर हिट गायब, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, ५ दिवस यलो अलर्ट

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकचं नेटफ्लिक्सवर दमदार पदार्पण, ‘ग्रेटर कलेश’मध्ये झळकली खास भूमिकेत!

SCROLL FOR NEXT