कोल्हापूर

महिन्याभरात त्यांची टाळी झाली बंद.

मोहन मिस्त्री

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे समाजातील कामगार आणि कष्टकरी वर्गाचे हाल होत आहेत. त्यांना मदत देण्यासाठी शेकडो संस्था हातभार लावत आहेत; पण सध्या कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने शहरात शेकडो तृतीयपंथीयांना खाण्यापिण्याची पंचाईत झाली आहे. 
सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींकडून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. 
भीक मागणे, रेल्वेत पैसे मागणे किंवा रेणुकादेवीचा लिंब काढणे, लग्नात हळद काढणे अशी कामे हे तृतीयपंथी करतात. गेल्या महिन्यापासून यातील काही जणांच्या टाळीचा आवाज थांबला आहे, तर लग्नाचे विधी थांबल्याने अनेकांचे तुणतुणे बंद झाले. 
समाज या लोकांना सहजासहजी स्वीकारत नाही. मग ना शाळा, ना शिक्षण. नाकारले जाण्याच्या भावनेतून समाजाविरोधात बंडाची भावना यांच्या मनात तीव्रतेने येते. या वर्गासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सध्या गरज आहे. यातील अनेक तृतीयपंथी कलाकार आहेत. काही मायाळू तृतीयपंथीयांनी मुली दत्तक घेऊन वेगळ्या वाटेने जीवन सुरू केल्याची उदाहरणे आहेत. काही लोक बधाई मागणारे असतात. याचा पौराणिक दाखला देताना श्रीराम जन्मावेळी बधाई मागितल्याचा उल्लेख असल्याचे काही अभ्यासक सांगतात. 
परंतु महिन्याभरापासून खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्या या समाजातील लोकांना काही दानशूर संस्थांनी हातभार लावलाय. त्यांची मैत्री संघटना या कामात अग्रेसर आहे. कोल्हापुरातील काही लोक नाशिक आणि धुळ्यात अडकले आहेत. इतर वेळी स्वतंत्रपणे किंवा मंदिरात राहणारे तृतीयपंथी आता सामूहिकपणे एकत्र राहून अडचणीला सामोरे जात आहेत. वैयक्तिक राहणे, घरभाडे देणे अशक्‍य झाले आहे. त्यामुळे अन्नधान्याची मिळालेली मदत एकत्रित करून एका कुटुंबाप्रमाणे कळंबा परिसरातील मयुरी यांच्या घरी सुमारे 12 ते 15 तृतीयपंथी राहत आहेत. 

दृष्टिक्षेपात 
* तृतीयपंथीयांची राज्यातील संख्या 5 लाखापर्यंत 
* जिल्ह्यात सुमारे 600 हून अधिक 
* शहरात 150 तृतीयपंथीय 

समाजाचा आमच्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन आहे; पण आमच्यातील प्रत्येकात काही कलागुण आहेत. यासाठी शासनाने योग्य प्रशिक्षण देऊन व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, म्हणजे अशा अडचणीच्या वेळी आमचे जगणे सुसह्य होईल. 
- मयुरी, कोल्हापूर 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...तर खत-बियाणे दुकानांचे परवाने रद्द! शेतकऱ्यांना लिंकिंगचा आग्रह, ज्यादा दराने व मुदतबाह्य खतविक्री नकोच; शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

NCERT Syllabus : सकारात्मक विचारांची पिढी घडवायची आहे;गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा उल्लेख वगळल्याबाबत सकलानींचे प्रतिपादन

Sakal Podcast : EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय?

Monsoon Update : मॉन्सूनची वाटचाल अडखळली;राज्यात सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला

Eid Ul Adha 2024 : बकरी ईद बनवा अधिक स्पेशल, घरच्या घरी करा ‘या’ पदार्थांचा बेत

SCROLL FOR NEXT