The woman from kasaba Bavda in Kolhapur is free from corona 
कोल्हापूर

दिलासादायक : कोल्हापुरच्या कसबा बावड्यातील ती महिला कोरोनामुक्त...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कसबा बावडा येथील मराठा काॅलनीतील महिलेचा कोरोनाचा पहिला अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. परत 14 दिसानंतरचा अहवाल निगेटीव्ह आला होता, आज तिसरा अहवाल निगेटीव्ह आला त्यामुळे ही महिला कोरोनामुक्त झाली.

6 एप्रिल रोजी या महिलेचा पहिला अहवाल पॉझिटीव्ह आला होता. सातारा ते कोल्हापूर दरम्यान या महिलेने अॅम्बुलन्स मधुन प्रवास केला होता.या महिलेस निमोनिया सदृश्य लक्षणे आढळुन आल्याने सेवा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या वेळी कोरोना टेस्ट मध्ये त्या पॉझिटीव्ह आढळुन आल्याने कसबा बावडा परिसरात खळबळ उडाली होती.सध्या त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 14 दिवस पुर्ण केल्या नंतर  दुसऱ्या चाचणीसाठी त्यांचा स्वॅब चाचणीसाठी पाठवला होता तो निगेटीव्ह आल्याने परत त्यांचा स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आला होता त्या रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

अन् कॉलनी गेली होती हादरून...

कसबा बावडा परिसराच्या एक किलोमीटर परिसरात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायाधीश निवासस्थानांसह जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी याच परिसरात रहायला आहेत. त्यामुळेच हा परिसर आता चांगलाच संवेदनशिल बनला होता. या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या प्रकाराने संपूर्ण कॉलनी हादरून गेली होती. आता ही महिला कोरोना मुक्त झाल्याने अन् या परिसरात आणखीन कोणी बाधित न सापडल्याने दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर; प्रशासनाकडून नवा आदेश जारी

Gold And Silver Rate: महत्त्वाची बातमी! २०२६ च्या अखेरपर्यंत सोने आणि चांदीचे दर किती असणार? तज्ञांनी आकडाच सांगितला!

Ranji Trophy : ऋतुराज गायकवाडचा भोपळा, पृथ्वी शॉच्या पाच धावा; महाराष्ट्राची ६ बाद ६६ अशी अवस्था, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश अशक्य

Leopard Viral Video Kolhapur : बिबट्या गायीच्या पिल्लाशी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरातील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीती

Shubhanshu Shukla : बंगळुरूच्या मातीत लपलेला चमत्कार! मंगळावर घरं बांधण्यात करणार मदत; पण कसं? शुभांशू शुक्लांचे आश्चर्यकारक संशोधन पाहा

SCROLL FOR NEXT