woman who was comforted, she went corona 
कोल्हापूर

ज्या महिलेचे सांत्वन केले, तिच निघाली कोरोना पॉझिटिव्ह

नामदेव माने

कसबा बीड : मैत्रीणीच्या पतीचे निधन झाले म्हणून सांत्वन करावयास गेलेल्या 19 महिलांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्या मधील एका महिलेची धाप वाढल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. 
चार दिवसापुर्वी चाफोडी (ता. करवीर) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या पत्नीचे कांचनवाडी व चाफोडीत सलोख्याचे संबंध आहेत.

शेतातील भांगलणी (खुरपणी) पासून छोट्या-मोठ्या कामासाठी ही महिला कांचनवाडी येथे कामासाठी जात होती. त्यामुळे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. ग्रामीण भागात गावात कोणाचाही मृत्यू झाला की त्यांच्या नातेवाईकांना बोलवायला (सांत्वन करायला) महिला बहुसंख्येने जात असतात. 

पण ज्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्या महिलेलाच कोरोना झाल्याचा अहवाल गावात पोहचला आणि सर्व महिलांची पाचावर धारण बसली. ही बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात येताच तातडीने या महिलांना त्याच्या घरातून थेट कोरोना कक्षात विलगिकरण करण्यात आले. आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. 

ग्रामीण भागात अंत्ययात्रेला, रक्षाविसर्जनला जास्त गर्दी करणे म्हणजे प्रतिष्ठा समजले जाते. ग्रामीण अशा भागात रूढी परंपरा पाळल्या जातात. पण सध्याच्या कोरोना संसर्ग वाढत आहे. सर्वच पातळीवर सोशल डिस्टन्सिंगसह दक्षता घेतली जात आहे. अशात शासकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. त्यामुळे फोनवरूनच सांत्वन करणे हिताचे आहे. गर्दी करू नका. ही जबाबदारी गावातील प्रतिष्ठित लोकांनी घेऊन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत 
- डॉ. मधुरा मोरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोली दुमाला. 

(संपादन : प्रफुल्ल सुतार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karmabhoomi Express Accident : हृदयद्रावक ! कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन युवक खाली पडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Panchang 19 October 2025: आजच्या दिवशी सूर्य कवच स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

माेठी बातमी! 'साेलापुरातील धानप्‍पाला बंगळूर पोलिसांनी उचलले'; कर्नाटक मंत्र्यांच्या मुलाला नेमकं काय म्हणाला?

Chandrakant Patil Sangli : सांगलीत भाजपकडून मित्रपक्षांना थेट दुय्यम दर्जा, 'जागा उरल्या तर मित्रपक्षांचा विचार'; चंद्रकांत दादांनी थेटच सांगितलं...

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

SCROLL FOR NEXT