women employees of Umed Mahila Abhiyan protested at the District Collector Office and submitted a statement to the district administration 
कोल्हापूर

अन्यथा आत्मदहन आंदोलन करणार ; उमेद महिलांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : उमेद अभियानाचे खासगीकरण तात्काळ थांबवा, तील गट, ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी तात्काळ द्यावा. बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप थांबवावा, विभागचे थकीत मानधन त्वरित वितरीत करावे, ज्या समूहांना खेळते भांडवल मिळालेले नाही त्यांना निधी द्यावा, यासाठी उमेद महिला अभियानातील कर्मचारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालवर मुकमोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या महिलांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी अभियानात समर्पित कर्मचारी व अधिकारी भरती केली. समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी ,कृषी सखी, पशु सखी, ग्रामसंघ लिपीका, कृती संगम सखी यासारखे अनेक विभाग ग्रामीण कुटुंबाचे शाश्वत उपजिविकेसाठी विविध उपक्रमाचे माध्यमातून कार्यरत आहेत. शिवाय 3 हजार समर्पित कर्मचारी या महिलांसाठी काम करत आहेत. उमेदच्या विविध संस्थांना 1400 कोटी पेक्षा जास्त निधी देऊन राज्य व केंद्र शासनाने महिलांच्या जिवनोन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत. आता हजारो महिला स्वतःची विविध उत्पादने निर्माण करून , व्यवसायाची कास धरून आत्म निर्भर होत आहे.

मात्र त्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्याऐवजी आघाडी सरकारने या अभियानाच्या मुळावर घाव घालण्याचा मार्ग अवलंबलेला आहे. उमेद अभियानाचे खासगीकरण केले जात आहे. यामुळे या महिलांवर अन्याय होणार आहे. त्यांना ठरलेला पगार किंवा इतर मानधन मिळणे दुरापास्त होणार आहे. याचा विचार करुन शासनाने उमेदचे खासगीकरण तात्काळ थांबवले पाहिजे. 


दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक नूतनीकरण करार संपले अशा 450 कर्मचाऱ्यांना गेल्या महिनाभरात ताटकळत ठेवले. करार नूतनीकरण होईल तुम्ही काम करत राहा असे सांगितले. आता त्यांनी एका परिपत्रकाद्वारे या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना देऊन सर्वांचे काम थांबविले आहे. सोबतच पुढील करार पत्र राज्याला पाठवू नये अशाही सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या नावाखाली हा प्रकार खपविला जात आहे. हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. केंद्र सरकारच्या एका पत्राचा आधार घेऊन बाह्य संस्थेमार्फत नोकर भरती करण्याचे षडयंत्र राबविले जात आहे. हे अभियान बाह्य संस्थेकडे देण्यापूर्वी कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे समायोजन करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता सरसकट सर्वांना बेरोजगार करण्यात आले आहे. 

अभियानाला वाचविण्यासाठी महिला रस्त्यावर उतरत आहे. या आंदोलनाने सरकारला जाग आली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल. काही दिवसात महिला स्वतः च्या हक्कासाठी आत्मदहन आंदोलन करतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही महिलांनी केली आहे. यावेळी, किरण रायकर, हमिदा बंड्डवल, सारिका पाटील, शकुंतला पाटील, सरस्वती वीराजदार, राधिका पाटील, गौतमी चव्हाण, मनिषा कोळी, विदुला कांबळे, ज्योती पाटील, रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.  

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Stock Market Closing Bell : शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात बंद; सेसेक्स 519 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

IPL 2026 : KL Rahul च्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सने KKR समोर ठेवले तीन पर्याय, कोलकाता फ्रँचायझीने दाखवला ठेंगा

ODI Rankings: स्मृती मानधनाच्या सिंहासनाला धक्का! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला टेन्शन देणारी फलंदाज बनली नंबर वन

SCROLL FOR NEXT