कोल्हापूर

Gokul Election: उत्कंठा वाढवणाऱ्या लढतीत शौमिका महाडिकांची बाजी तर विरोधी गटातून रेडेकर विजयी

सुनील पाटील

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत (Gokul Election)महिला गटात विरोधी गटातील अंजना केदारी रेडेकर (Anjana Redekar) तर सत्तारूढ गटातील शौमिका अमल महाडिक(Shaumika Mahadika) विजयी झाल्या.

रेडेकर यांनी शेवटच्या फेरीतही मताधिक्‍य कायम राखत बाजी मारली. आठव्या फेरीत महाडिक यांनी लीड तोडून मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली. रेडेकर यांना 1872, तर महाडिक यांना 1769 मते मिळाली. सत्तारूढ गटातील अनुराधा पाटील-सरूडकर (Anuradha Patil-Sarudkar)व विरोधी गटातील सुश्‍मिता राजेश पाटील(Sushmita Patil) पराभूत झाल्या. पाटील-सरूडकर यांना 1704 व पाटील यांना 1723 मते मिळाली.

गोकुळच्या निवडणुकीतील मतमोजणीस सकाळी सुरवात झाल्यानंतर महिला गटाने सर्वांचेच लक्ष वेधले. दोन फेऱ्यांत सत्ताधारी गटाच्या पाटील-सरूडकर यांनी 415, तर महाडिक यांना 410 मते मिळाली होती. विरोधी गटाच्या सुश्‍मिता पाटील यांना 420, तर रेडेकर यांना 463 मते मिळाली. चौथ्या फेरीत सरूडकर यांना 881, महाडिक यांना 858, तर विरोधी गटाच्या पाटील यांना 843 व रेडेकर यांना 925 मते मिळाली होती.

दरम्यान, महाडिक यांच्या आघाडीने सत्ताधारी गटाला दिलासा मिळाला. त्यामुळे पुढच्या फेरीत कोण मताधिक्‍य अधिक घेणार याकडे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, सातव्या फेरीत पुन्हा पाटील यांनी 1505 मते मिळवून आघाडी घेतली. महाडिक यांना या फेरीत 1483 मते मिळाली. तसेच रेडेकर यांनी तब्बल 1660, तर पाटील-सरूडकर यांना 1453 मते मिळाली. या फेरीत रेडेकर यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अखेरच्या फेरीत रेडेकर विजयी होताच विरोधी गटाचे समर्थक आनंदित झाले. त्याचबरोबर सत्ताधारी गटातून महाडिक विजयी झाल्याने सत्ताधारी गटानेही आघाडीच्या नेत्यांच्या नावाने जयघोष केला.

Womens group victer redekar and mahdik Gokul Doodh Sangh Election results kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT