Womens Post Office starting in Kolhapur 
कोल्हापूर

या कार्यालयात काम करणार फक्त महिलाच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : फक्त महिला कर्मचाऱ्यांकडून चालवले जाणारे जिल्ह्यातले पहिले महिला टपाल कार्यालय सोमवारी (ता. ९) शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालमीजवळ सुरू होत आहे. या ठिकाणी पूर्वीपासून टपाल कार्यालय आहेच; पण आता या टपाल कार्यालयातील सर्व कर्मचारी महिला असणार आहेत. 
टपाल खात्याच्या धोरणानुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक महिला टपाल कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्या धोरणाचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी पेठ पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू होत आहे. यापूर्वी मुंबईत एक महिला टपाल कार्यालय सुरू आहे.

कोल्हापुरात सुरू होणाऱ्या या टपाल कार्यालयाच्या पोस्टमास्तर म्हणून ज्योत्स्ना वांद्रे व माणिक कदम या काम पाहणार आहेत. 
वेताळमाळ तालमीजवळ या पूर्वीपासून सुरू असलेल्या टपाल कार्यालयात पुरुष कर्मचारी होते. पण टपाल विभागाचे धोरण व महिला टपाल कर्मचाऱ्यांना सोयीचे म्हणून वेताळमाळ तालमीजवळ टपाल कार्यालयाची निश्‍चिती केली. शहरात एकूण २० टपाल कार्यालये आहेत. आता २१वे टपाल कार्यालय फक्त महिला कर्मचाऱ्यांचे असेल. या टपाल कार्यालयात टपाल, अंतर्देशीय विक्री, रजिस्टर पत्रे नोंदणी, पोस्ट बचत खाते, टपाल स्वीकारण्याचे काम होईल. टपाल वितरण मात्र टपाल विभागाच्या बलभीम बॅंक इमारतीतील मुख्य कार्यालयातूनच होणार आहे.
उद्या सकाळी ११ वाजता वेताळमाळ तालमीजवळ टपाल विभागाचे अधीक्षक ईश्वर पाटील, या प्रभागाचे नगरसेवक अजित राऊत व वेताळमाळ तालमीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत या टपाल कार्यालयाच्या कामाचा 
प्रारंभ होईल.

पोस्टमन ते पोस्टमास्तरपर्यंत महिलाच
देशात विविध पोस्ट कार्यालयांत ४० हजारांहून अधिक महिला कर्मचारी आहेत. टपाल वितरणाचे कामही महिला पोस्टमन करतात. मुंबईत एक कार्यालय फक्त महिला कर्मचाऱ्यांच्याकडून चालवले जाते. या टपाल कार्यालयातील पोस्टमनपासून पोस्टमास्तरपर्यंत सर्व कर्मचारी महिलाच आहेत. आता त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी टपाल कार्यालय महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरुवात सोमवारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: भारताचा झिम्बाब्वेला व्हाईटवॉश! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर मयंक यादव-यश ठाकूरच्या माऱ्यासमोर यजमान गारद

परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार? उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना; PM मोदींची मोठी घोषणा

Raigad Heavy Rain : रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर; 12 जणांचा मृत्यू, हजारो घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान

Bundibugyo Ebola Vaccine : ‘बुंडीबुग्यो इबोला’ लसीचा पहिला मानवी डोस; जगातील पहिल्या चाचणीला सुरुवात

Kurduwadi Barshi Traffic Jam : आषाढीवारीहून परतणाऱ्या वाहनांमुळे कुर्डूवाडी–बार्शी मार्ग ठप्प; रिधोरेच्या सीना पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT