Work is underway to appoint administrators in 1576 expired Gram Panchayats 
कोल्हापूर

मोठा निर्णय : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी महत्वाची बातमी

सुनील पाटील

कोल्हापूर :  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्यातील मुदत संपलेल्या  1576 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे काम सुरू आहे. दरम्यान जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये  मुदत संपलेल्या राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. 

ज्या-ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल तस-तशी  संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती सकाळीशी बोलताना दिली.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी

राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये १ हजार ५६६
ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या
 काळात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज,
प्रचारसभा, मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामुले लोक एकत्र येतात. यातूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या
निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात
आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून
 राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही.
 त्यामुळे  सध्या निवडणुका घेणे शक्य नाहीत. 

७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा
कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे या सर्व
ग्रामपंचायतींवर सरकारतर्फे शासक नेमण्याचा निर्णय
घेण्यात आला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान १२ हजार ६६८ 
ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव 
रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच या निवडणुकांमुळे वाढणारी जोखीम लक्षात घेऊन यानिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील ६ महिने  कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी सरकारने केलेली विनंती राज्य निवडणुक आयोगाने मान्य केली असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT