The workers from the border areas have to get permission from the Maharashtra Police to go to Maharashtra 
कोल्हापूर

सीमाभागातील कर्मचाऱ्यांना वाली कोण ?

अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) - सीमाभागातील अडीच-तीन हजार युवक महाराष्ट्रातील कागल पंचतारांकित, गोकुळ शिरगाव व शिरोली औद्योगिक वसाहतीस (एमआयडीसी) कामावर आहेत. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. येथून महाराष्ट्रात जाण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. अत्यावश्यक सेवा, रुग्ण यांच्याशिवाय कोणालाही महाराष्ट्रात सोडले जात नाही. आता औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाले आहेत. पण पोलिस बंदोबस्तामुळे कामगारांना महाराष्ट्रात कामासाठी जाणे अवघड झाले आहे. या ठिकाणी अनेक कामगार येऊन आपण कामावर जात असल्याचे सांगत असून पोलिस त्यांना परत पाठवून देत आहेत. त्यामुळे कुचंबणा होत असून आपला वाली कोण? असा सवाल करण्यात येत आहे.

सीमाभाग महाराष्ट्रापासून पोरका

लाॅकडाउनमुळे हाताला काम नसल्याने आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या कारखाने सुरू झाले आहेत. पण कामावर जाता येत नाही. अशा परिस्थितीत अडकलेल्या सीमाभागातील युवकांसमोर  मोठे संकट उभे ठाकले आहे.महाराष्ट्र प्रशासनाकडून सीमाभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. एरव्ही सीमाभागाचा संपर्क महाराष्ट्राशी येतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभाग महाराष्ट्रापासून पोरका झाला आहे.

कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र पोलिसांनी तपासणी नाका उभारला आहे. येथून महाराष्ट्रात जाताना आडकाठी येत आहे. कोणतीही माहिती विचारली असता अपमानित करण्यात येत असल्याने सीमाभागातून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटकात तपासणी नाका उभारला असताना स्थानिक लोकांची अडचण केली जात आहे. तरी देखील राजकीय नेते, अधिकारी गप्प का? असा सवाल केला जात आहे.
 

 

'गेला दीड महिना हाताला काम नाही. सध्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने सुरू झाले आहेत. कामावर येण्यासाठी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. कंपनीकडून देण्यात आलेले पास पोलिस ग्राह्य धरत नसून परत पाठवले जात आहे. महाराष्ट्रात कामावर जायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- महावीर चौगुले,
कर्मचारी, औद्योगिक वसाहत कागल

'सीमाभागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. या बाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.'
- दत्तात्रय नाळे,
निरीक्षक, कागल पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT