the workers welfare board working as a digital platform in kolhapur its helps to all employees working under this board 
कोल्हापूर

कोल्हापुरात कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाई

शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सात महिन्यांपूर्वी लॉकडाउन पुकारला. अनेक कारखाने बंद झाले, कामगार गावी गेले. नवीन कामगार भरती थांबली. कामगारांत चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाईन होईल. यात कामगार नोंदणी व योजनांचे लाभ ऑनलाईन सुविधेद्वारे घेता येणार आहेत. 

खासगी कारखाने, दुकाने, व्यावसायिक संस्था, महामंडळात काम करणाऱ्या कामगारासाठी  कमागार कल्याण मंडळातर्फे नोंदणी केली जाते. संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित अस्थापनाने त्या कामगारांच्या नोंदणीसाठी लेबर आयडी नंबर मंडळाला देणे अपेक्षित आहे. 

वर्षातून एक वेळा कामगार नोंदणी शुल्क १५ ते २५ रुपये भरणे आवश्‍यक आहे. त्यातून संबंधित कामगारांच्या मुलांना मंडळातर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण दिले जाते. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक कामगार आजवर कार्यालयात येणे कागदपत्रे सादर करणे तसेच अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे, मंजुरी घेणे यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. यात कामगारांचा वेळ व पैसा जात होता. ही बाब विचारात घेता कामगार कल्याण मंडळाचे कामकाज डिजिटल करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मंडळाची कार्यालये माहिती तंत्रज्ञानाने 
जोडली जातील. 

कामगारांच्या योजना व तसेच मंडळाच्या कामकाजाची माहिती, नवे निर्णय याची माहिती देणारे संकेतस्थळ होईल. कामगारांना थेट नोंदणी करणे व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारासाठी मोबाईल ॲपही तयार होत आहे. या ॲपद्वारे कामगारांना नोंदणी करणे किंवा योजनांचा लाभ घेता येणे शक्‍य होणार आहे. 

"कामगार कल्याण विभागाकडील ऑनलाईन कामकाज करण्याचे तांत्रिक काम सुरू आहे. त्यासाठी कामगार कल्याणच्या शहरातील सहाही कार्यालयांत संगणक बसविण्यात येत आहेत. त्याची जोडणी व अन्य कामे सुरू आहेत. लवकरच ऑनलाईन सुविधा कार्यान्वित होईल."

- विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी

दृष्टिक्षेपात

- जिल्ह्यात खासगी आस्थापना : ४५००
- औद्योगिक क्षेत्रात : १ लाख ३० हजारांवर कामगार 
- व्यापारी क्षेत्रात : १ लाख १० हजार कामगार 
- कामगार कल्याणकडे अवघे ३५ टक्के नोंदणी  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT