वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने कोल्हापुरी दागिन्यांबद्दलची डोकमेंटरी चित्रित केली आहे.  esakal
कोल्हापूर

World Gold Council : ‘ज्वेलरी ऑफ कोल्हापूर’ होणार वर्ल्ड फेमस

Kolhapuri Jewellery : जगभरातील ग्राहकांना ‘चला दाजिबा, कोल्हापूरला तुम्ही या, चला…’ असे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

Kolhapur : जगभरात सोन्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून आता अस्सल कोल्हापुरी दागिन्यांचे मार्केटिंग होणार आहे. कौन्सिलच्या माध्यमातून ‘ज्वेलरी ऑफ कोल्हापूर’ या डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण नुकतेच येथे पूर्ण झाले असून, लवकरच ती कौन्सिलच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने जगभरातील ग्राहकांना जणू ‘चला दाजिबा, कोल्हापूरला तुम्ही या, चला…’ असे आवाहनच केले जाणार आहे.

कोल्हापुरी साज हा जगप्रसिद्ध आहे आणि ‘एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज…’’ या लावणीने तर त्याची कीर्ती सर्वदूर पोहोचवली आहे. कोल्हापुरी साजाबरोबरच शिंदेशाही तोडा, वज्रटीक, पुतळी हार, बुगडी आदी दागिन्यांच्या निर्मितीवर डॉक्युमेंटरी साकारली आहे. त्याशिवाय सोन्याच्या वाढत्या भावामुळे चांदीमध्येही यातील काही दागिने तयार होतात आणि त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. या दागिन्यांनाही जगभरातून मागणी आहे.

फक्त कोल्हापुरातच घडतात मणी

साजासह अस्सल कोल्हापुरी दागिने आणि त्यासाठी लागणारे लंबट व गोलसर मणी फक्त कोल्हापुरातच घडतात. कारण कुशल कारागीर आणि त्यांना साथ देणारे पूरक हवामान येथे आहे. सोन्याचा सर्वाधिक पातळ पत्रा फक्त कोल्हापुरातच काढता येतो. त्यामुळे एक ग्रॅम सोन्यातून येथे वीस मण्यांची निर्मिती होते, तर इतर ठिकाणी मण्यांची ही संख्या आठ ते दहा इतकीच भरते. एकूणच दागिन्यांचा विचार केला तर कोल्हापुरी दागिना ‘लाईटवेट’ असतो. त्या तुलनेत जगात कुठल्याही ठिकाणचे दागिने वजनाने अधिक असतात. या साऱ्या गोष्टींवर डॉक्युमेंटरीमधून प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

हस्तकलेचा उत्तम आविष्कार

अलीकडच्या काळात रेडीमेड दागिन्यांची बाजारपेठ इतकी मोठी आहे की आता सोन्यासारखाच दिसणारा कुठलाही दागिना केवळ शंभर रुपयात उपलब्ध होऊ लागला आहे; पण अस्सल कोल्हापुरी, लखलखीत, घसघशीत आणि घरंदाज बाज हवा असेल, तर तो कोल्हापुरी साज आणि कोल्हापुरी दागिन्यांमुळेच मिळतो आणि त्याचमुळे या दागिन्यांची भुरळ कायम आहे. कारण हे सर्व दागिने हस्तकलेचा उत्तम आविष्कार आहेत.

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जगभरातील नव्या पिढीसमोर अस्सल कोल्हापुरी दागिने जाणार आहेत. त्याचा येथील सराफ व्यावसायिकांना नक्कीच फायदा होणार आहे. यापूर्वी कौन्सिलने ‘ज्वेलरी ऑफ आसाम’ डॉक्युमेंटरी केली असून कोल्हापूरच्या डॉक्युमेंटरीसाठी पन्हाळा, पंचगंगा घाट, खिद्रापूर आदी ठिकाणी बारा दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

- राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ संघ

बदलत्या काळातही घसघशीत कोल्हापुरी दागिन्यांना मागणी आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटांमुळे या दागिन्यांची क्रेझ नव्या पिढीतही आणखी वाढली आहे. कोल्हापुरातील कुशल कारागीरांमुळे कर्नाटकी साजही आता आपल्याकडे तयार होतो. कोल्हापुरी साजाबरोबरच ठुशी, लाखी माळ, पट्टी, पुतळी हार, ड्रॉप्स माळा, वज्रटीक, चिंचपेटी आदी दागिन्यांना मागणी वाढतच आहे.

- विजयकुमार भोसले-सरदार, इंडियन बुलियन

अँड ज्वेलर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT