world sparrow day 2021
world sparrow day 2021 
कोल्हापूर

Video -जागतिक चिमणी दिन; चिमणी-पाखरांबाबत वाढली सजगता!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढला आहे. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले असून, अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पनांना यश मिळते आहे. आता काही गावं चिमण्यांची गावं म्हणून नावारूपाला येत आहेत. चिमणी हे एक प्रातिनिधीक उदाहरण असले तरी एकूणच पक्ष्यांबाबतची सजगता आता घरांघरांत वाढली आहे आणि त्यातूनच आता नव्याने काही कृती कार्यक्रमांवर भर दिला जातो आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त आपापल्या घरातच सर्व मंडळी अशा उपक्रमांत सहभागी होणार आहेत. 


घरच्या घरी तयार करा जलपात्र
वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जलपात्रे तयार केली जात आहेत. मातीच्या पसरट भांड्याला सुरवातीला मधोमध एक छोटे छिद्र पाडायचे आहे. या छिद्रातून नटबोल्टच्या सहाय्याने रिकाम्या पाण्याचे टोपण आतील बाजूने फिट करून घ्यायचे आहे. भांड्याच्या बाहेरील भाग एमसीलने सील करायचा आहे. त्यानंतर विविध रंगात हे भांडे रंगवू शकतो. यानंतर प्लास्टिक बाटलीला खालील बाजूस चार छोटी छिद्रे पाडायची आहेत. त्यानंतर पाण्याने भरलेली ही बाटली विशिष्ट पद्धतीने या भांड्यामध्ये फिट करायची आहे. पक्षी येतील अशा ठिकाणी ती ठेवता येतील किंवा अडकवता येतील. 


असे तयार करा नैसर्गिक घरटे
निसर्गमित्र संस्थेने यंदा दुधी भोपळ्यांपासून घरटी तयार केली आहेत. त्याबाबतची प्रात्यक्षिकेही दाखवली जाणार आहेत. त्यासाठी माले मुडशिंगी येथील बाजीराव नाईक या शेतकऱ्याने दुधी भोपळे संस्थेला उपल
ब्ध करून दिले आहेत. पोकळ असणाऱ्या भोपळ्याला समान आकाराची दोन छिद्रे पाडल्यानंतर तो झाडावर हॅंगिंग करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तार बांधायची आहे. परिसरात आवश्‍यकतेनुसार ती लावायची आहे.  

लोकसहभागातून ‘सकाळ’ची मोहीम 
  ‘सकाळ’ने २० मार्च २०१२ ला ‘चला, चिमण्या वाचवू या’ अशी साद कोल्हापूरकरांना घातली
  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध अनुभव अनेक घटकांनी ‘सकाळ’सोबत केले शेअर 
  विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने व ‘सकाळ’च्या पुढाकाराने साडेचार हजार घरट्यांचे वाटप  
  २०१२ ते २०१५ या काळात अधिकाधिक चिमण्या अंगणात याव्यात, यासाठी विविध संकल्पनांसह जनजागृती 
  चित्र, छायाचित्र प्रदर्शन, स्लाईड शोंचे विविध ठिकाणी आयोजन 
  गेल्या पाच वर्षांत सोशल मीडियावरून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली आणि ती पोचली संपूर्ण जगभरात  
  वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधकामाचे प्लॅन्स बनवितानाच चिमण्या व पक्ष्यांसाठी  आश्रयस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्‍यक डिझाइन्स तयार केली. अनेकांनी ती प्रत्यक्षात अमलात आणली 
  कुंभार गल्ल्यांत खास चिमणी व इतर पक्ष्यांसाठी मातीची पराळं (जलपात्रे) तयार होऊ लागली 
  टेरेस बागेत चिमण्या व पक्ष्यांसाठी सुविधा देताना फूडकोर्ट, वॉटर- ज्यूस सेंटर, स्वीमिंग सेंटर सुरू 
  विशेष मुलांच्या शाळांनी तयार झालेली घरटी विविध संस्थांच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे तर जगभरात गेली 
  भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या चोथ्याचे कण अडकून अनेक पक्षांचा मृत्यू. त्याला पर्याय म्हणून नारळाच्या शेंडीपासून तयार केलेल्या चोथ्याचा  वाढला वापर .

व्हिडिओ  पाहा - 

 

<

<
>

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT