wrestler reshma mane one year ban by national coach kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरची दंगल गर्ल रेश्मा वर का घातली गेलीय बंदी...?

सुयोग घाटगे

कोल्हापूर - येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्‍मा माने व देशभरातील अन्य काही महिला कुस्तीपटूंवर वर्षाच्या बंदी आदेशाने कुस्ती वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये अनुपस्थित असल्याचा ठपका ठेवत ही बंदी लागू केली आहे; मात्र रेश्‍माच्या डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने शिबिरातून रीतसर माघार घेतल्याचे तिचे वडील अनिल माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

प्रशिक्षकाने रेश्‍मा काढले वर्षभर बंदी आदेश 

टोकिओ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी देशभरातील खेळाडू विविध शिबिरामध्ये मेहनत घेत आहेत. सध्या साई (स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया)च्या अंतर्गत लखनौ येथे राष्ट्रीय सरावादरम्यान रेश्‍माच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर असून, अधिक वाढू नये, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तसेच ‘साई’च्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील उपचारासाठी तिला राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर आणण्यात आले आहे; मात्र प्रशिक्षकाने तिच्यावर वर्षभर बंदी आदेश काढले आहेत, असेही श्री. माने यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या कारवाईला ज्येष्ठ कुस्तीपटूंचा विरोध 

या आदेशाची दखल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतली असून, रेश्‍मा मानेचा वैद्यकीय अहवाल डब्लू.एफ.इ. (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया)ला देण्यात आला आहे. मुळातच रितसर परवानगी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला आणि अहवाल सादरीकरणानंतर राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली. त्यानंतरही खेळाडूंवर बंदी घालण्याच्या या प्रकारावर कुस्ती तज्ज्ञांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. उपचारासाठी एखादा खेळाडू रितसर परवानगीने व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बाहेर पडत असेल तर त्याच्यावर अनुपस्थितीचा ठपका ठेवून बंदी घालणे योग्य नसल्याचे मत देखील ज्येष्ठ कुस्तीपटूंनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये सरावादरम्यान रेश्‍माच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन केंद्रातून बाहेर आलो आहे. बंदीने ऑलिम्पिकची वाट धूसर आहे. बंदी मागे घेण्यासाठी कागदपत्रे, वैद्यकीय अहवालाची प्रत पाठवली.
- अनिल माने, रेश्‍माचे वडील

हा बंदी आदेश चुकीचा असून, तो मागे घेण्यासाठीच पाठपुरावा परिषदेमार्फत सुरू आहे. मुळातच कोणताही प्रशिक्षक खेळाडूवर बंदी घालू शकत नाही. हे अधिकार सर्वस्वी स्पोर्टस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अशा अधिकृत संस्थांनाच आहेत.
- बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT