Yashwantrao Chavan, Bandati, Sardar Bali and Sardar Talim preserving the legacy of enlightenment! 
कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण, बंदाटी, लढाऊ बाणा अन्‌ प्रबोधनाचा वारसा जपणारी सरदार तालीम! 

संभाजी गंडमाळे : वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सरदार तालीम म्हणजे लढाऊ बाणा आणि प्रबोधनाची परंपरा जपणारी एक जुनी तालीम. मर्दानी खेळात या तालमीचा नेहमीच दबदबा राहिला. गणपतराव सासने दोरी बंदाटी फेकण्यात अग्रेसर. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यातही त्यांनी ही कला नेली आणि त्यांना "सरदार' ही पदवी मिळाली. त्यानंतर मग याच नावाने सरदार तालीम नावारूपाला आली. 

सरदार तालमीचा लौकिक मर्दानी खेळाबरोबरच सूरपाट्या, भजन आणि पटसोंगट्या या क्षेत्रातही. रोज रात्री तालीम परिसरात फरीगदगा, दांड-पट्टा, लाठी, बंदाटी, भालाफेक आदी शिवकालीन युद्ध कौशल्याचे धडे शिकवले जायचे. तालमीला लागूनच असलेल्या रस्त्यावर सूरपाट्याचा खेळ मध्यरात्रीपर्यंत चालत असे. कुस्तीच्या आखाड्यात तर रोज पहाटे आणि सायंकाळनंतर शड्डू घुमायचे. अनेक नामांकित मल्ल या तालमीने दिले आणि त्यांनी अनेक प्रतिष्ठेचे फड गाजवले. फुटबॉल हा शिवाजी पेठेचा श्‍वास. मात्र, तालमीच्या तरुण खेळाडूंना शिवाजी तरुण मंडळाच्या टीममध्ये संधी मिळायची नाही. त्यामुळे मग तालमीने स्वतःचा फुटबॉल क्‍लब तयार केला आणि फुटबॉलचे मैदानही गाजवले. 1946 पासून तालमीत गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आणि या निमित्ताने तालमीने पानसुपारीची परंपरा निर्माण केली. गणेशोत्सवाबरोबरच तालमीने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची मोहरमची परंपरा बदलत्या काळात आजही जपली आहे. तालमीच्या इमारतीचे नूतनीकरण झाल्यानंतर उद्‌घाटनासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. 

163 वर्षांचा वारसा... 
सरदार तालमीची स्थापना 9 ऑगस्ट 1857 ची. सहाजिकच जुलमी ब्रिटिश राजवटीविरोधात झालेल्या बंडात तालीम अग्रेसर होती. स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक गुप्त बैठका तालमीत झाल्या होत्या. तालमीचे मल्ल स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती आडुरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे राहिले आहे. एकूण 163 वर्षांचा विचार केला तर या तालमीने कुस्ती, मर्दानी खेळ, फुटबॉल अशा विविध खेळांबरोबरच सर्व क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. शहराच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत ही तालीम सतत अग्रेसर राहिली आहे. सर्वच क्षेत्रातील अनेक यशोलौकिकाचे शिलेदार या तालमीने दिले. त्याची नुसती यादीच काढायची म्हटली तरी तो एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल. 


पर्यावरणपूरक विचार... 
पहिल्यापासून प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या या तालमीने पर्यावरणाचा विचार परिसरात रुजवला. रंकाळा संवर्धनासाठी पुढाकार घेतला. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येथील नव्या पिढीने आजही हा संस्कार जपला असून, विविध पर्यावरणपूरक उपक्रमावर नेहमीच भर दिला आहे. गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तीचा आग्रह धरताना त्याची सुरुवात पहिल्यांदा तालमीपासून केली. पर्यावरणपूरक विसर्जन ही संकल्पना तालमीने अधिक व्यापक केली. गणेश विसर्जनादिवशी तालमीच्या परिसरातच पर्यावरणपूरक विसर्जनाचा उपक्रम राबवला जातो आणि त्यातून संकलित होणारी माती पुन्हा कुंभार बांधवांना दिली जाते. गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ असो, गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप असो किंवा अगदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही तालीम नेहमीच आधारवड ठरली आहे. शिस्तप्रिय गणेश मिरवणुकीचा आदर्शही या तालमीने घालून दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT