for this year jyotiba temple painting work done or not in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : यंदा जोतिबा मंदिराची शिखरे रंगवणार का? ग्रामस्थांसह, भाविकांचा प्रश्न

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : गेल्या वर्षी येथील श्री दख्खनचा राजा जोतिबा मंदिरातील शिखरांचे रंगकाम कोरोनामुळे झाले नाही. मात्र यंदा तरी रंगकाम होणार का? असा प्रश्न भाविकांना पडला आहे. जोतिबाची चैत्र यात्रा यंदा २६ एप्रिलला आहे. यात्रा होणार का नाही याबाबतही अजून कोणता निर्णय झालेला नाही. परंतु मंदिराच्या सुरक्षततेसाठी शिखरांचे रंगकाम होणे आवश्यक असते.

दरवर्षी मार्च - एप्रिल महिन्यात म्हणजे पावसाळ्यापूर्वी शिखरे रंगवली जातात. सततच्या पावसाची रिपरिप, दाट धुके याचा शिखरांना सामना करावा लागतो. या परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने पावसाचे पाणी शिखरातून मंदिरात येते. यात्रेपूर्वी शिखरांचे रंगकाम केले जाते. पावसाळी हवामानामुळे दाट धुके 
आणि जोरदार पावसामुळे शिखरांवर सर्रास शेवाळ येते. छोट्या झुडपे, गवत उगवून येते. त्यामुळे दरवर्षी ही शिखरे स्वच्छ करून त्यावर रंगकाम करण्याची पारंपरिक पद्धत डोंगराव आहे.

परिसरात महादेव (बद्रीकेदार) चोपडाईदेवी व श्री. जोतिबा अशा तीनही मंदिरांचा समूह आहे. तिन्ही मंदिराची शिखरे उंच असून शिखरावर चढ-उतार करण्याचे काम अवघड आहे. यावर चढाई करताना दोर लावावा लागतो. गेल्या पंचवीस वर्षापासून हे काम कसबा बावडा रमणमळा येथील अनिल अधिक करतात. साधारणत: आठ - दहा दिवसांत हे काम पूर्ण होते. 

उन्हामुळे मंदिर परिसरातील दगड तापतो. पायाला चटके बसतात. त्यामुळे सकाळी लवकर किंवा दुपारनंतर हे रंगकाम करावे लागते. वंशपरंपरेनुसार शिखरावर ध्वज (पताका) लावण्याचे काम छत्रे कुंटुंबाकडे आहे. यांच्या परिवारातील सदस्यांना मंदिर शिखरावर ध्वज लावण्याची कला अवगत आहे. 

दरम्यान शिखरांना स्वच्छ केल्याने आणि ऑइलपेंट कलर केल्याने वर्षभर काहीही अडचण होत नाही. फक्त पावसाळ्यात हा रंग निघून जातो. रंगकामानंतर ही शिखरे आकर्षक दिसतात. त्यामुळे मंदिराला शोभा येते. २०२० मध्ये भाविकांविनाच चैत्र यात्रा पार पडली. डोंगर गुलालमय झालाच नाही.किमान मंदिराच्या सुरक्षतेसाठी शिखरांचे रंगकाम करणे आवश्यक असल्याने ग्रामस्थ, पूजारी यांच्यासह भाविकांमधून याची मागणी होत आहे . 

भाविकांची मागणी 

कोरोना काळात नवरात्र उत्सवावेळी करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिराची शिखरे देवस्थान समितीने रंगवली मात्र मागील चैत्र यात्रेला जोतिबा मंदिराची शिखरे रंगविली नाहीत. यंदा तरी शिखरे रंगविण्याचा घाट देवस्थानने घालावा, अशी मागणी ग्रामस्थांसह भाविकांची करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT