The Young Farmer Got 94 Percent Marks Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शेती करीत मिळवले विज्ञान शाखेत 94 टक्के, वाचा चंदगड तालुक्यातील तरूणाचा परिस्थितीशी झगडा...

सुनील कोंडुसकर

चंदगड : दुपारी कॉलेज सुटले की थेट शेत गाठायचे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आई-वडिलांना मदत करायची. शेतात काम नसेल, तर जनावरे चरायला सोडायची. त्यांच्यावर नजर ठेवत पुस्तकात लक्ष घालायचं. घरी आल्यावर रात्री 12 पर्यंत आणि पहाटे दोन तास अभ्यास करायचा. केवळ महाविद्यालयातील शिकवणीवर, कोणताही जादाचा शिकवणी वर्ग न लावता 12 वी विज्ञान शाखेत दोन्ही ग्रुप घेऊन 94 टक्के गुण मिळतात हे काहीसे अवघड वाटते; परंतु तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील संदीप वैजनाथ मिलके याच्या यशाची ही वास्तव कथा आहे. 

संदीपची कौटुंबिक पार्श्‍वभूमी गरिबीची. अल्पभूधारक असल्याने आई-वडील दुसऱ्या गावात जाऊन खंडाने शेती करतात. दुभती जनावरे हाच आर्थिक उत्पन्नाचा स्रोत. शेतीचा व्याप सांभाळायचा, तर कुटुंबातीत सर्वांचाच हातभार हवा. संदीप सुरवातीपासूनच हुशार, पण त्याला कामात सवलत नव्हती. शेतात राबल्याशिवाय पर्यायच नव्हता. संदीपनेही कधी सवलतीची अपेक्षा केली नाही. गावातून हलकर्णी महाविद्यालयापर्यंत तीन किलोमीटर तो चालत ये-जा करायचा.

दुपारी कॉलेज सुटल्यावर सायंकाळपर्यंत वडिलांना शेतात मदत करायचा. उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा. ग्रामीण भागात शिकवणी वर्ग नसताना वर्गातील अध्यापनाचे आकलन करून नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने डोंगराएवढे यश मिळवले. "ए' व "बी' हे दोन्ही ग्रुप ठेवून त्याने 94 टक्के गुण मिळवले. जीवशास्त्राला पैकीच्या पैकी 100, तर गणितात 99 गुण मिळवून त्याने चुणूक दाखवून दिली. त्याच्या यशाला कष्टाची आणि जिद्दीची किनार आहे. वक्तृत्व, प्रश्‍नमंजूषा यासारख्या स्पर्धेत त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तो कविताही चांगल्या करतो. युपीएससीचा अभ्यास करून भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा त्याचा संकल्प आहे. 

ध्येय गाठल्याशिवाय आता थांबणार नाही
गरिबीचे अवडंबर न करता पुढे जायचे असेल, तर शिक्षण हेच साधन ओळखून त्यावर स्वार झालो आहे. ध्येय गाठल्याशिवाय आता थांबणार नाही. 
- संदीप मिलके 
 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

SCROLL FOR NEXT