Young Man Help For Remove The Puncture Of Essential Service Vehicles Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांचे पंक्‍चर काढण्यासाठी राबतोय हात

राजेश मोरे

कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात वाहन पंक्‍चर झाले, चाकातील हवा कमी झाली, अशा अडचणी अत्यावश्‍यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्यांच्या डोकेदुखी ठरत आहेत. त्यांच्या या अडचणी वेळीच सोडविण्यासाठी मंगळवार पेठेतील अमर यादव हे पुढे आले आहेत. 

मंगळवार पेठ तुरपतजवळ अमर पांडुरंग यादव यांचे सायकल, मोटारसायकल पंक्‍चर काढण्याचे दुकान आहे. ते गेली 23 वर्षे हा व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ ही याच व्यवसायवर चालतो. संचारबंदीच्या काळात त्यांचा हा व्यवसाय बंद आहे. दररोजचा घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्‍न त्यांच्याही डोळ्यासमोर आहे. सध्या शहर परिसरात फक्त अत्यावश्‍यक सेवेतील वाहनेच रस्त्याने दिसतात.

पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. फळ, भाजी विक्रेते, गॅस वितरणाचे काम असणारे अनेक जण रस्त्यावर सेवा देण्याचे काम करत आहेत. यावेळी वाहनाचे चाक पंक्‍चर झाले, हवा कमी झाली, तर करायचे काय, असा दिव्य प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहतो. अनेकदा वाहन रस्त्यावर उभे करून त्यांना पायीच जावे लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन अमर यादव हे पुढे आले आहेत. त्यांनी अत्यावश्‍यक सेवा बजावणाऱ्यांच्या वाहनांसाठी आपले दुकान उघडून सेवा बजावण्याचे काम हाती घेतले आहे. 

अडचण दूर करण्याचा प्रयत्न 
शहर परिसरात सुमारे एक हजारभर आम्ही पंक्‍चर व्यवसायिक आहोत. त्यांच्या माध्यमातून अत्यावश्‍यक सेवा बजावणाऱ्यांना वाहनांच्या चाकाचे पंक्‍चर, हवा भरण्याची होणारी अडचण दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. 
- अमर यादव, पंक्‍चर व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT