The Youth Of Jambhali Village Is Working For Tree Conservation Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वृक्ष संवर्धनासाठी झटतोय जांभळीतील अवलिया

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : वर्तमान आणि भावी पिढ्यांचा विचार करून पर्यावरण वाचवण्यासाठी आज जो तो आपापल्या परीने झटतो आहे. जांभळी (ता. शिरोळ) येथील गोविंदा जाधव त्यापैकीच. आजवर असंख्य वृक्षांना जगवणारा हा अवलिया झाडांसाठी रात्रंदिवस तत्पर असतो. जांभळीच्या भकास माळावर वृक्ष संवर्धनासाठी गोविंदाचे सुरू असलेले काम अतुलनीय आहे. 

जुने घरे पाडण्याचे काम करत मिळालेला प्रत्येक क्षण गोविंदा वृक्ष संवर्धनासाठी खर्च करतो. घरातून बाहेर पडताना गोविंदाच्या हातात पाण्याची बादली अथवा बाटली नाही असे कधीच झाले नाही. "काय मर्दाओ, नुसता फोटो काढायला येता हो, झाडे कोण जगवणार?' अशा अधिकार वाणीने गोविंदा झाडे लावणाऱ्यांना विचारत असतो. आपल्या चिमुकल्या मुलांसोबत कित्येक वर्षांपासून आजही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वाधिक वेळ गोविंदा झाडांसाठी देतो. 

काही वर्षापूर्वी जांभळीच्या स्मशानभूमीत काही देशी झाडांचे वृक्षारोपण केले. मात्र उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या आगीत ही झाडे पूर्णपणे होरपळी. या झाडांना जीवदान देण्यासाठी गोविंदा धावला. मिळेल त्यावेळी पाण्याची सोय करत पोटच्या मुलांप्रमाणे झाडांची काळजी घेतली. आता स्मशानभूमीत निर्माण झालेले हिरवाईचे सौंदर्य वाखाण्याजोगे आहे. 

झाडांसाठी रात्र जागतो 
पाण्यासाठी विजेची वेळ बहुतांश रात्रीच असते. अशावेळी गोविंदा झाडांना पाणी मिळावे म्हणून रात्रभर जागतो. झाडांसाठी वेळेची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्‍यात घालून काम करतो. 

स्वयंश्रम तत्त्वावर सेवा 
ना ग्रामपंचायतीचा वृक्ष लागवडीचा निधी, ना कोणाचे आर्थिक पाठबळ अशा रितीने गोविंदा अनेक वर्षापासून झाडांसाठी काम करतो. कोणाची वाट न पाहता वृक्ष संवर्धनासाठी गोविंदाची सदैव "एकला चलोरे' ची भूमिका असते. 

प्रत्येक क्षण झाडांसाठी
आपण मातीतून घडलो असल्याने प्रत्येकाने मातीशी इमान राखायलाच हवा. आपले घर परिसरात जमेल तशी झाडे लावायला हवीत. येत्या काळात प्रत्येक क्षण झाडांसाठी जगत राहणे माझा मानस आहे. 
- गोविंदा जाधव, वृक्षप्रेमी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT