Yuva Maharashtra Sena esakal
कोल्हापूर

इचलकरंजीत मृत माशांचे केले उत्तरकार्य; युवा सेनेचे अनोखे आंदोलन, 'त्या' अधिकाऱ्यांना घालणार 100 किलोचा हार

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमधील (Panchganga River) वाढत्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले.

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न झाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी दिला.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीमधील (Panchganga River) वाढत्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाबाबत जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचा युवा महाराष्ट्र सेनेतर्फे (Yuva Maharashtra Sena) अनोखे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. मृत माशांचे पाप इचलकरंजीवासीयांना लागू नये, पंचगंगा नदी घाटावर माशांचे पिंड दान करण्यात आले.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न झाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी दिला. उगम स्थानापासून ते नृसिंहवाडीच्या संगमापर्यंत ६५ ते ७० किलोमीटर पंचगंगा नदीचा प्रवास असून, जवळ-जवळ ४९ गावांचे सांडपाणी थेट विना प्रक्रिया नदीमध्ये मिसळते. कोल्हापूर (Kolhapur) शहराचे कागदोपत्री ४२ एमएलडी मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळते.

१ एमएलडी पाणी म्हणजे १० लाख लिटर पाणी तर ४२ एमएलडी म्हणजे ४ कोटी २ ० लाख लिटर पाणी मिसळते, तर कागल, हातकणंगले, इचलकरंजी, परिसरातील ३० एमएलडी उद्योग धंद्याचे व मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना अधिकारी मात्र कागदी घोडे नाचवत आहेत. त्यांचा १०० किलोचा हार घालून सत्कार करणार असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. यावेळी सदाशिव बंडीगणी, हुसेन पटेल, सतीश कवडे, बसवराज तकळगी, भरत जोशी, आनंदा नाईक, राजू दंडी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT