The Zilla Parishad Leader Of Opposition Said, Hand Over The Management Of Corona In Kolhapur District to The Army Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे व्यवस्थापन लष्कराकडे द्या, "यांनी' केली पालकमंत्र्यांकडे मागणी

निवास चाैगले

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीतून सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी जिल्ह्यातील कोरोनाचे व्यवस्थापन लष्कराकडे द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी पत्रकाद्वारे केली. या मागणीचे पत्र त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये द्यावेत, अशीही मागणी भोजे पत्रकात केली आहे. 

पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात दररोज किमान 700 ते 800 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. रोज 30 ते 40 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घटकांना आयुष्यमान योजनेतून मोफत उपचार देण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेशनकार्डधारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्याचे जाहीर केले होते, पण कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता या योजनांचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

सामान्य रुग्णांना या योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे असे लोक स्थानिक लोकप्रतिनिधीकडे दाद मागत आहेत, पण लोकप्रतिनिधींना खासगी रुग्णालयात दाद देत नाहीत. त्याचबरोबर खासगी डॉक्‍टर एचआरसीटी केल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत, या तपासणीचा खर्च चार ते पाच हजार आहे, ही तपासणी मोफत करावी. 

"रेमडिसिव्हर' दुप्पट दराने 
कोरोनाबाधितांना रेमडिसिव्हर इंजेक्‍शन कमी दरात उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले होते, पण अजूनही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्‍शन कमी दरात सोडाच, पण दुप्पट दराने दिले जात असल्याचा आरोपही भोजे यांनी पत्रकात केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT