पश्चिम महाराष्ट्र

दिलासा; सांगलीत कृष्णेची पाणी पातळी ओसरायला सुरवात

अजित झळके

सांगली : कृष्णाकाठच्या सांगलीकरांना हायसे वाटेल, अशी बातमी आहे. कृष्णा नदीच्या महापुराचे पाणी कमी व्हायला आता जिल्ह्यात सुरवात झाली आहे. वाळवा तालुक्यातील बहे येथे महापुराचे पाणी एक फुटाने कमी झाले आहे. त्याआधी कराड येथे पाणी पातळी सुमारे साडेसात फुटाने कमी झाली आहे. त्यामुळे सांगली शहरात आयर्विन पुलाजवळ रात्री आठपर्यंत पाणी पातळी कमी व्हायला सुरवात होईल. त्याआधी ही पातळी स्थिर होईल.

सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार बहे येथे एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. ती पहाटे सहा वाजता ३३.६ होती, सायंकाळी ती ३२.६ इतकी झाली आहे. आता पाणी कमी व्हायला गतीने सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. कारण, काल उत्तररात्री दोन वाजता कराडमध्ये कृष्णा पुलावर ५१.३ असलेली पातळी आज सायंकाळी सहा वाजता ४३.५ फुटांवर आली होती.

कराड ते सांगली हे अंतर पाहता आणि पाण्याचा वेग पाहता किमान दहा ते बारा तासांनी त्याचा परिणाम सांगलीत दिसायला लागतो. त्यानुसार आज रात्री आठच्या सुमरास सांगलीत पाणी पातळी स्थिर होऊन ती कमी व्हायला लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सन २०१९ ची पुनरावृत्ती होईल की काय, अशीभिती असलेल्या सांगलीकरांना थोडे हायसे वाटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसामुळे नाणेफेकीस उशीर

SCROLL FOR NEXT