realway track 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे ट्रॅकने गावाकडं... मजुरांचा बेंगलुरू ते जबलपूर पायी प्रवास

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः कोरोनामुळे काम थांबले आणि सुरू झाला उपासमारीच्या दिशेने प्रवास. गावी तर जायचंय पण रस्ता माहिती नाही. मग निघाले रेल्वेच्या मागे. बेंगलुरूहून निघालेत आणि त्यांना जायचंय जबलपूर(मध्यप्रदेश)कडे.

पायी निघालेला एक ३५ वर्षीय मजूर दोन दिवसांपूर्वी कान्हेगाव परिसरातील रेल्वे मार्गाने पायी जात होते. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन दमल्यानंतर सायंकाळी त्याने कान्हेगाव परिसरात विश्रांतीसाठी थांबला होता. 

ग्रामस्थांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, सदर मजूरासह त्याचे सहकारी तीस मजूर बेंगलुरूहून पुण्यात पायी आले होते. पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत क्वारंटाईन केले. दोन दिवसांनी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर प्रत्येक जण विभागून गावाकडे रवाना झाला आहे.

आर्थिक मदतीनंतर अफवा

माजी पोलीस पाटील अर्जुन खरात, अशोक खरात, भीमराज खरात, वसंत खरात, काका खरात यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली. विनायक खरात, बाळासाहेब खरात यांनी अर्थिक मदत केली. सकाळी ग्रामस्थांनी त्याला ग्रामसेवक महेश तायडे यांच्या ताब्यात दिले. तायडे यांनी त्याची आरोग्य तपासणी करुन काॅरंटाईन करण्याऐवजी त्याला गावातून चालते होण्यास सांगितले. तो मजुर गावातून निघून गेल्यानंतर तायडे यांनी तो पळुन गेल्याची अफवा पसरवली. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

पळाला, पुन्हा धरले आणि चोपले

हा प्रकार पोलिसांना माहित होताच त्यांनी त्याला पढेगाव येथे पकडुन चोप दिला. तेथुन तो दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा रेल्वेमार्गाने पायी निघाल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी दर्शविली. स्थानिक प्रशासनाने सदर मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन काॅरटांईन करायला हवे होते. लाॅकडाऊननंतर तो गावी परतला असता. ग्रामसेवकाने त्याला पुन्हा शेकडो किलोमीटर पायी प्रवास करण्यास भाग पाडले. त्यामुळे वरिष्ठ अधिकर्यांनी ग्रामसेवकांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी कान्हेगाव ग्रामस्थांनी केली. 

.............

लाडगाव शिवारात दोन दिवसांपुर्वी आढळलेला मजूर रात्री कान्हेगाव येथे थांबला होता. ग्रामस्थांनी त्याची जेवणाची व्यवस्था केली होती. आपण ही माहिती दुसर्या दिवशी सकाळी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांना दिली होती. वडाळामहादेव येथे त्याला तपासणीला नेण्यासाठी रिक्षाचा शोध घेताना तो नजर चुकवुन पळाला. याची माहिती पोलिसांनाही दिली आहे. -ग्रामसेवक, महेश तायडे, कान्हेगाव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT