Ladegaon villagers close village to reduce electricity bill 
पश्चिम महाराष्ट्र

वीज बिल कमी करण्यासाठी लाडेगाव ग्रामस्थांचा गाव बंद

प्रकाश भालकर

कुरळप  : महावितरणने कोरोना काळात दिलेल्या घरगुती वीज बिलांमध्ये 50 टक्के कपात व शेतीसाठी असलेल्या कृषी पंपाचे शंभर टक्के वीज बिल माफ करावे, यासंदर्भात आज कडकडीत गाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला. गाव बंदच्या माध्यमातून लाडेगावने महावितरण च्या विरुद्ध असंतोष व्यक्त केला. आज दिवसभर अत्यावश्‍यक सेवा सोडल्यास सर्व काही शंभर टक्के बंद होते. 

लाडेगाव (ता. वाळवा) येथील एक छोटेशे गाव. काही दिवसात महावितरण कडून बिल भरा अन्यथा कनेक्‍शन तोडू अशी भूमिका घेतल्याने ग्रामीण भागात महावितरणच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. यातच काही लोकांचे कनेक्‍शन महावितरणकडून तोडले गेले. 

आता सरकारने जाहीर केले आहे जोपर्यंत बिलाच्या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यत कोणाचेही कनेक्‍शन तोडू नका. तरीही महावितरणकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वारंवार फोन करून बिल भराच असे बजावले जात आहे. यामुळे लाडेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सरकारने दिलेला शब्द पाळावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा व वीज बिलात सूट द्यावी या मागणीसाठी लाडेगावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. 

कोरोना काळात सर्वसामान्यांना वीज बिल मोठ्या प्रमाणात आले आहे. सर्वत्र बंद असल्याने ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती कोलमडून पडली आहे. सर्वसामान्यांना इतके वीज भरणे शक्‍य नाही. त्यामुळे घरगुती बिलात पन्नास टक्के, शेतीसाठीच्या बिलात शंभर सूट व वाढीव स्ट्रेटला तत्काळ मंजुरी द्यावी. 
- रणधीर पाटील, सरपंच, लाडेगाव. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघाला धक्का! २२ वर्षीय खेळाडू पहिल्या तीन T20I सामन्यांतून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Police Bharati Application Website Link : पोलिस भरतीचा अर्ज करा एका क्लिकवर..

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा

बापरे! पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT