pond sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : शहर परिसरातील तलाव अतिक्रमनाच्या विळख्यात

सर्वेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : वडगाव परिसरातील सरकारी तलावांचे सर्वेक्षण करून तलावांचा विकास करावा अशी मागणी सातत्याने या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र तलावांच्या सर्वेक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे दिवसेंदिवस तलावांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वडगावसह शहर परिसरातील तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेचे दिसून येत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. पटवर्धन संस्थान काळापासून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वडगाव शहापूर आणि जुने बेळगाव परिसरात तलाव आहेत.(Large scale encroachment on lakes is taking place day by day due to neglect lake surveys)

यापैकी जुने बेळगाव येथील तलावाचा काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे मात्र शहापुर शिवार आणि मंगाई नगर व वड्डर छावणी परिसरातील तलावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वडगाव परिसरात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तलावांचा विकास करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु तलावांचा विकास केला जात नसल्याने तलावात गाळ व जलपर्णी पहावयास मिळत आहे. तसेच गाळ काढला जात नसल्याने तलावातील पाणी काही दिवसातच आटून जात असल्याने मार्च एप्रिल व मे महिन्यात शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत तलावांचे सर्वेक्षण करून तलावांचा विकास करावा अशी मागणी होऊ लागली आहे.(large number of farmers in wadgaon it is necessary to develop the lakes and provide a large amount of water to the farmers)

तलावांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाचे सर्वेक्षण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून जलपर्णी वाढली आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

-मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT