पश्चिम महाराष्ट्र

' उरमोडी ' चे पाणी अखेर वळईत ; माणदेशींच्या डोळ्यात आनंदाश्रू 

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड  : दुष्काळी भागास वरदान ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प "उरमोडी' चे पाणी अखेर माण तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला वळई येथे पोचले आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणी हजारो माणदेशींच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दिसून आले. ग्रामस्थ समाधानही व्यक्त करत होते. 

उरमोडी प्रकल्पाचे काम गेली 24 ते 25 वर्षे सुरू आहे. सुरवातीस धरण नंतर भूसंपादन, पुनर्वसन यातून हा प्रकल्प अखेर मार्गी लागलेला आहे. आरफळ कालव्यातून सुमारे 50 किलोमीटर अंतर पार करत हे पाणी प्रारंभी दोन टप्प्यांमधून उचलून पहिला टप्पा वाठार कुरोली तर दुसरा टप्पा कोंबडवाडी येथे पोचते. तेथून पाणी उचलून हे पाणी खटाव तालुक्‍यातील वडी येथे पोचते. तेथून पुढे 76 किलोमीटर बोगद्यातून हे पाणी माण तालुक्‍यातील किरकसाल येथे पोचते. किरकसाल येथून गोंदवले, काळेवाडी, वडजल, कुकुडवाड, वळई येथे जवजवळ 40 किलोमीटर अंतर पार करत जिथे पाण्याचे दुर्भिक्ष, चारा छावण्या आहेत, अशा भागात येऊन पोचले आहे. येथून ओढ्यामार्गे पाणवन, गंगोती, पुळकोटी, शिरताव, पळसवडे, देवापूर, जांभुळणी येथे हे पाणी पोचणार आहे. त्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहेत. जांभुळणी येथील तलाव तसेच गंगोती तलाव भरल्याने दुष्काळी भागाची तहान भागवली जाणार आहे. 

वळई येथे उरमोडी कालवा संपल्यामुळे येथून पुढे आठ किलोमीटर पाणी जांभुळणीपर्यंत तारळी प्रकल्पाच्या माध्यमातून दहा ते 15 दिवसांत वळईमार्गे पोचणार आहे. या परिसरात बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी देण्याचे काम सुरू आहे. वळईपर्यंत पाणी आणण्यासाठी दहा ते 12 दिवसांपासून रात्रंदिवस काम केल्याचे उरमोडी प्रकल्पाचे मोळावडे, घोलप यांनी सांगितले. याकामी कार्यकारी अभियंता वडे, गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. 

गोरेंच्या अध्यक्षतेखाली होणार पूजन 

उरमोडीच्या पाण्याचे पूजन जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. वळईपासून गंगोती तलावाकडे पाणवनच्या ओढ्यातून जात असताना मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाणार आहे. श्री. गोरे यांनी दूरदृष्टी ठेऊन साखळी बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT