पश्चिम महाराष्ट्र

व्हिडिओ कॉलींगद्वारे आईचे अंत्यदर्शन 

आयाज मुल्ला

वडूज : सर्वत्र कोरोना विषाणूने मोठा धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन व जमावबंदीदेखील केली आहे. अशा परिस्थितीत आईने घेतलेला जगाचा निरोप आणि आईचे अंत्यदर्शन मुलीला व अन्य नातलगांना व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले. महिमानगड (ता. माण) येथील ही हृदयद्रावक घटना आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कुकुडवाड शाखेचे सेवानिवृत्त शाखाप्रमुख शौकत मुलाणी यांच्या पत्नी रुक्‍साना मुलाणी यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती सर्व नातलगांना देण्यात आली. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्था बंद आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जमावबंदी आदेश लागू केला असल्याने नातलगदेखील अंत्यविधीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे घरातील मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
मयत रुक्‍साना यांची विवाहित मुलगी निलोफर शेख अकलूज (जि. सोलापूर) येथे आहे, तर त्यांची एक स्नुषा दरे (ता. कोरेगाव) येथे तर सिद्धेश्वर कुरोली व कऱ्हाडला दोन पुतणे आहेत. सर्वत्र लॉकडाऊन व वाहतूक व्यवस्थाच बंद असल्यामुळे मुलगी निलोफर शेख, जावई आतिक व नातवंडे जिल्हाबंदी असल्याने येऊ शकत नव्हते. तर अन्य नातलगही जिल्ह्यात असूनसुद्धा अंत्यविधीला येऊ शकत नव्हते. एकुलती एक मुलगी निलोफर यांना आपल्या आईचे अखेरचे दर्शनदेखील घेता येत नव्हते. शेवटी महिमानगड येथून घरातील काही व्यक्तींनी निलोफर यांना अकलूज येथे व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलिंगद्वारे मुलीने आईचे अंत्यदर्शन घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगामुळे महिमानगड परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अशाही परिस्थितीत महिमानगड येथे मुलाणी कुटुंबीयांनी लॉकडाऊन व जमावबंदीचा नियम पाळला. 

Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT