Launch of 70-bed Covid Care Center at Madrasa in Islampur 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूरातील मदरसात 70 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर सर्व समाजांचे आधार केंद्र बनेल, असा विश्वास राज्याचे जल संपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाज व शासनाच्या माध्यमातून उभा रहाणाऱ्या सोईसुविधामधून निश्‍चितपणे कोरोनाचा मृत्यूदर कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

येथील ख्रिश्‍चन बंगला परिसरातील चॉंदतारा मदरसामध्ये मुस्लिम समाजाने सुरू केलेल्या 70 बेडच्या अद्यावत कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, उपनगराध्यक्ष दादासो पाटील उपस्थित होते. 
श्री. पाटील म्हणाले,""कोविडच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने केलेल्या व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. या स्थितीत समाजाने पुढे येऊन काही सुविधा उभा करणे कौतुकास्पद आहे. सध्या हॉस्पिटलची बिले ऐकून रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात नाही, हा आपला पराभव आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्याचे कायम भान ठेवत सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा व हात धुवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमात सहभागी होवून शहर, गाव "शून्य रुग्ण' संख्येवर आणा.'' 

मुनिर पटवेकर, अजहर जमादार, अल्ताफ मोमीन यांची भाषणे झाली. सेंटरचे प्रणेते पिरअली पुणेकर, मुबारक ईबुशे, डॉ. फरिदूद्दीन आत्तार, डॉ. मोहसीन मुजावर यांचा श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ. नरसिंह देशमुख, अरविंद माळी, ऍड. चिमण डांगे, विजय पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, हाफिज जावेद, रफीक पठाण, शकील जमादार, आयुब हवलदार, बशीर मुल्ला, ऍड. मिनाज मिर्झा, जावेद ईबुशे, मासुम गणीभई, हिदायतुल्ला जमादार, जलाल मुल्ला, आबीद मोमीन, अश्‍पाक पुणेकर, नियाज बीजपुरे, राजू जमादार, अबुबकर मकानदार, इस्माईल पुणेकर, इम्रान डंगरे, अजहर मोमीन, सैफ अली, रमिझ दिवाण, एजाज मणेर उपस्थित होते. 


हॉस्पिटल गुरुवारी सेवेत 
70 बेडच्या हॉस्पिटलमध्ये पाच आयसीयु बेड आहेत. एक्‍सरेसह सर्व बेडना ऑक्‍सिजन सुविधा आहे. मलेशियावरून दोन ड्युरा सिलेंडर मागवली आहेत. गुरुवारपासून हॉस्पिटल सेवेत राहणार असल्याचे पिरअली पुणेकर यांनी सांगितले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Uruli Kanchan : दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई; सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

फक्त संपत्तीतच नाही तर वयानेही विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ; दोघांच्या वयात किती आहे अंतर?

SCROLL FOR NEXT