देवेंद्र फडणवीस  
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेत संख्याबळ जमले तरच बदल: देवेंद्र फडणवीस

सकाऴ वृत्तसेवा

मुंबईत पुढील आठवड्यात बैठक घेऊ आणि मग निर्णय करु, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीला दिली.

सांगली: जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाचे पाऊल उचलताना संख्याबळ जमते का पाहा. मी स्वतः त्याची पडताळणी करतो. मुंबईत पुढील आठवड्यात बैठक घेऊ आणि मग निर्णय करु, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीला दिली.

पंढरपूर येथे श्री. फडणवीस यांच्या दौऱ्यात कोअर कमिटीने त्यांची भेट घेतली. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, सम्राट महाडिक यांनी श्री. फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांच्यापुढे जिल्हा परिषदेतील घडामोडींसह जिल्ह्यातील परिस्थितीचा थोडक्यात आढावा सादर केला.

खासदार संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेत बदल अनिवार्य असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. प्राजक्ता कोरे यांना अध्यक्षपदी संधी देताना एक वर्षानंतर बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शब्द पाळला पाहिजे, बदल केला पाहिजे, पाच नव्या लोकांना संधी मिळेल, आता वेळ करून चालणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. अन्य सदस्यांनी जिल्हा परिषदेत बदलास कुणाचाही विरोध नाही, मात्र संख्याबळ तपासून, खात्री करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी समजून घेतली.

नेमके कोणते सदस्य सोबत राहतील, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेईल, याविषयी चाचपणी केली. बदल करायचा असेल तर बहुमत स्पष्ट होईल, याची खात्री करून घ्या. मी स्वतः काही लोकांशी बोलेन आणि मुंबईत बैठक घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाचे पाऊल उचलताना संख्याबळ जमते का पाहा. मी स्वतः त्याची पडताळणी करतो. मुंबईत पुढील आठवड्यात बैठक घेऊ आणि मग निर्णय करु, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT