The leopard is roaming; When will the fencing work of "Sagareshwar" be done? 
पश्चिम महाराष्ट्र

बिबट्या वावरतोय; "सागरेश्‍वर'च्या कुंपणाचे काम कधी होणार? 

जयसिंग कुंभार

सांगली ः बिबट्याच्या वावरामुळे सागरेश्‍वर अभयारण्याच्या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी रेंगाळले कुंपणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीचे काम अद्याप प्रलंबित असून गेल्या जानेवारीमध्येच या कामाचा कार्यादेश देण्यात आला होता, मात्र ठेकेदाराने टाळाटाळ केल्याने आता हे काम 2013 पासून रखडले आहे. 

सागरेश्‍वर अभयारण्याचा विस्तार सुमारे एक हजार सत्त्याऐंशी हेक्‍टर क्षेत्रात आहे. ते देशातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. स्वातंत्र्यसैनिक-वृक्षमित्र धोंडिराम महादेव मोहिते यांनी 1970 पासून या अभयारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमधून 1983 मध्ये सागरेश्वर अभयारण्य अस्तित्वात आले. मात्र तेव्हापासून हे अभयारण्य बंदिस्त करण्यासाठी कुंपण भिंतीचे काम आजअखेर सुरुच आहे.

अनंत अडचणींवर मात करीत हे काम मुंगीच्या गतीने आता पूर्णत्वास आले आहे. सध्या कुंडलच्या बाजूचे अडीच किलोमीटर आणि आसदच्या बाजूचे दीड किलोमीटरचे कुंपणाचे काम अपूर्ण आहे. या भागातून अभयारण्यातील हरणांचा खासगी शिवारात वावर होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. मात्र आता बिबट्यांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी आहे. 

अभयारण्याच्या बाहेर म्हणजे सोनसळ, वांगी, कडेगावच्या बाजूला हरणांचे मोठ्या प्रमाणात कळप आहेत. हे कळप आधीपासूनच आहेत. बिबट्यांच्या वावरामुळे हे कळप बाहेर पडलेले नाहीत. शिवारांमध्येच ती जन्मली आहेत आणि वाढली आहेत. त्यांना पुन्हा अभयारण्यात आणायचे झाल्यास पकडण्यासाठी त्यांना केंद्रीय स्तरावर परवानगीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

पकडताना त्यांना इजा होण्याची शक्‍यता असते. त्यांच्यापासून माणसांना कोणताच त्रास नाही. पिकांच्या नुकसानीची शक्‍यता आहे. गेली अनेक वर्षे या हरणांचा कडेगावच्या शिवारांमध्ये मुक्त वावर आहे. तारेच्या कुंपणामुळे अभयारण्यातील हरणे बाहेर पडणार नाहीत. सध्याच्या स्थितीत कुंपणाचा तरी दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे. 

निधी बांधकाम विभागाकडे वर्ग
तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कार्यकालात 2013 मध्ये अभयारण्याच्या कुंपणाचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठीचा निधीही बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. उर्वरित काम पूर्ण करावे यासाठी आम्ही पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत.'' 
- विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, सागरेश्‍वर अभयारण्य 

संपादन : यवराज यादव 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT