Leopard Seen On Kagal Nidhori State Road Kolhapur News 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे ! कागल - निढोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन

प्रकाश तिराळे

मुरगूड ( कोल्हापूर ) - कागल - निढोरी राज्यमार्गावर व्हराड गायब झालेल्या मंदिराजवळ आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मुरगूड नगरपरिषदेचे कर्मचारी अमर कांबळे हे मुरगूडहून कागलच्या दिशेने कामानिमित्त मोटरसायकलवरुन जात होते. यावेळी त्यांना  कागल - निढोरी राज्यमार्गालगत असणाऱ्या व्हराड गायब झालेल्या मंदिराच्या समोर बिबट्याचे दर्शन झाले. रस्त्यापासून अवघ्या थोड्या अंतरावरच  बिबट्या त्यांना दिसला अशी माहिती त्यांनी दिली. बिबट्याला रस्तालगत पाहताच त्यांची घाबरगुंडी उडाली आहे. स्वतःला सावरत त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. कागलच्या दिशेने ते मोटारसायकलवरून वेगात निघून गेले.  

मुरगुड परिसरात गव्याचेही दर्शन

दरम्यान शनिवारी ( ता.23 ) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुरगूड (ता. कागल ) येथील अनिकेत रामाने व संदीप सुतार हे दोघे कागलहून मुरगूडच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांना भडगाव पाटीनजीक रस्त्याच्या मध्यभागीच पूर्ण वाढ झालेल्या गवा रेड्याचे दर्शन झाले होते. गव्याच्या दर्शनाने परिसरात भितीचे वातावरण होते. आता त्यात बिबट्याच्या वावरामुळे अधिकच भर पडली आहे. हा परिसर लोकांच्या वर्दळीचा व नागरी वस्तीचा आहे. शिवाय परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकरी रात्री अपरात्री उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात जात असतात. त्यामुळे बिबट्या व गवा रेड्याच्या वावराने हा परिसर भितीच्या छायेखाली आला आहे. वनविभागाने तात्काळ या परिसरात गवारेडा व बिबट्यासाठी शोध मोहिम राबवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

मळगे पाटीजवळ दर्शन

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मी मोटरसायकलवरुन कोल्हापूरला परिक्षेसाठी जात होतो. मळगे पाटीजवळ असणाऱ्या मंदिराच्या पुढच्या बाजूला रस्त्याच्या कडेलाच अचानक बिबट्या असल्याचे दिसले. मी भांबावून गेलो व गाडी आहे त्याच वेगाने चालवत पुढे गेलो.
 - अमर कांबळे, मुरगूड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT