leopard three baby going on forest department sangli marathi news
leopard three baby going on forest department sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत उसाच्या पाचटखाली सापडलेली बिबट्याची पिल्ले अखेर आईच्या कुशीत

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : .वाळवा तालुक्यातील सुरूल या गावाच्या पूर्व बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतात  बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. येथील शेतकरी सदाशिव पाटील यांच्या शेतात ऊसतोड करत असताना ही पिल्ले निदर्शनास आली. या पिल्ल्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. 


सुरुल येथे सोमवारी सकाळी गावाच्या पूर्वेला ओढ्यावरील पुलाजवळ सदाशिव पाटील यांची शेती आहे.  या शेतात नेहमीप्रमाणे ऊसतोड सुरू होती. ऊसतोड सुरू असताना  सरीमध्ये पडलेल्या उसाच्या पाचटाच्या खाली बिबट्याची तीन पिल्ले ग्रामस्थांना दिसली.  यावेळी ग्रामसेवक राजेंद्र देवकर माजी सरपंच संतोष पाटील, पोलीस पाटील,माणिक पाटील यांनी वन विभागाला तात्काळ कळवले. वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. व बिबट्याच्या पिलांना सुरक्षित केले. अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मादीचा शोध परिसरात घेतला. परंतु मादी आढळून आली नाही . यांना शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. वन विभागाच्या वतीने यावेळी ड्रोन कॅमेराच्या द्वारे बिबट्याचा शोध सुरू होता .

 उसाच्या शेतात बिबट्याने या पिलांना जन्म दिल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे महामार्गाच्या पट्ट्यामध्ये त्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विजेचा लपंडाव रात्रपाळी दिवस पाळीने शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर ,वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक राहिला पाटोळे अमोल साठे शहाजी खंडागळे यांच्यासह वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  

मादीची पिल्ले तिच्या आईच्या कुशीत

सोमवारी रात्री वनविभागाने मादी पिलांना घेऊन जाईल अशा ठिकाणी सुरक्षित ठेवले होते. यावेळी रात्री उशिरा  येऊन मादीने बछड्यांना घेऊन गेल्याचे कॅमेरात चित्रबद्ध झाले आहे.

दीपाली सागावंवकर, वनरक्षक अधिकारी, शिराळा, इस्लामपुर

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT