पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील ३३ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत

सकाऴ वृत्तसेवा

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये कंपन्यांनी दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. परंतु केंद्र शासनाने खतासाठी ज्यादा अनुदान घोषित करून खताच्या किमती नियंत्रित केल्या आहेत.

सांगली : केंद्र सरकारने खतांच्या किंमती (Fertilizer prices) कमी करुन त्याबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही जादा दराने खत विक्री (Fertilizer sales) करणाऱ्या तीन कृषी दुकानांवर आणि ३० दुकानांदारांनी वेळेवर नुतनीकरण न केल्याने त्यांचे परवाने निलंबीत (Licenses suspended) केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्ताळी यांनी दिली. खरीप हंगाम पार्श्‍वभूमीवर खते, बियाणांच्या जादा दराने विक्री आणि तपासणीसाठी शनिवारी ( ता. २९) व रविवारी ( ता. ३०) जिल्ह्यातील सर्व कृषी दुकानांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (license of 33 agricultural service center in sangli have been suspended)

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये कंपन्यांनी दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. परंतु केंद्र शासनाने खतासाठी ज्यादा अनुदान घोषित करून खताच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. शेतकऱ्यांना सुधारित कमी झालेल्या किमतीनुसार सुधारित दराने खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यामधील सर्व खत कंपनी प्रतिनिधी व खत वितरकांना ऑनलाईन बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या आहेत. जर कोणी जादा दराने खताची विक्री केली तर संबंधितांचा विक्री परवाना निलंबित करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. तरीही जिल्ह्यातील श्री दत्त कृषी सेवा केंद्र मिरज व बेडग यांच्याकडून जादा दराने विक्री होत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

जिल्ह्यात खताचे होलसेल व रिटेल असे एकूण ३ हजार १७५ वितरक आहेत. जिल्ह्यामध्ये १५ एप्रिलपासून सहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात ३२ गुणनियंत्रण निरीक्षक व ११ भरारी पथकामार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नुतनीकरण केलेले नाहीत व जादा दराने खत विक्री करत आहेत अशा परवानाधारक त्यांचे ३० परवाने निलंबित करण्यात आले आहेत व त्यांना नोटीस बजावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये मिरजेतील २, वाळव्यातील १०, शिराळा येथील २, खानापूर- २, तासगाव-७ ,कडेगाव पलूस आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक, कवठेमंकाळ तालुका 3 आणि जत तालुक्यातील ४ दुकानांचा समावेश आहे.

जिल्ह्यामधील सर्व निविष्ठा वितरकांची तपासणीसाठी २९ व ३० मे रोजी मोहिम स्वरूपात सर्व भरारी पथकामार्फत तपासणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कुठेही जादा दराने निविष्ठा विक्री किंवा खतांची विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर सहा नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधून तक्रारीची नोंद करावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

दुष्टिक्षेपात

- खरीप क्षेत्र- ३.८४ लाख

- खत मागणी- १.४२ लाख टन

(license of 33 agricultural service center in sangli have been suspended)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT