lingana fort trek complete by one teacher team in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

मनात धडकी भरवणारे सुळके पार करत लिंगाणा गड केला सर ; पाच तासात मोहिम फत्ते

सकाळ वृत्तसेवा

कुरळप (सांगली) : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणाऱ्या लिंगाणा किल्ल्यावर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या चमूने चढाई करीत सर केला. चित्तथरारक अशी ही मोहिम नुकतीच 'बा रायगड' या ग्रुपच्यावतीने पार पडली. 

प्राथमिक शिक्षक सचिन फल्ले (रा.वशी ता.वाळवा), सचिन कुंभार, निलेश लांडगे, अनिल मोरे (सर्व, रा. तासगाव), रोहित गुरव (रा.भिलवडी) यांनी या मोहिमेत भाग घेतला. त्यांच्या चमुने यापुर्वीही अशा यशस्वी मोहिमे केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरील लिंगाणा मोहिम आखली होती. या मोहिमेबाबत फल्ले म्हणाले, 'या किल्याचा टोकदार सुळका सर करण्यासाठी पाच तास लागले. त्यासाठी आधीपासून तयारी केली होती. ट्रेकिंगला जाणाऱ्यांमध्ये या मोहिमेची क्रेझ असते. त्यांचे सरळ उंच सुळके मनात धडकी भरवतात. उंच व अतिशय खडतर अशी ही चढण असते. 

समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंचीवर हा किल्ला आहे. सुळक्‍याच्या मध्यभागी एक गुहा आहे. या गुहेतच पूर्वी कैदी ठेवले जायचे म्हणतात. पूर्ण सुळका,दोरीच्या साहाय्याने चढावा लागतो. वर पोहचल्यावर दिसणारे विहंगम दृश्‍य पाहून चढाईचे सार्थक होते.

'बा रायगड' परिवाराचा भाग असलेले इटकरे (ता.वाळवा) येथील सौरभ महाडिक, चेतन कदम, दत्ताजी गुडदे, चेतन चव्हाण, अभिजित सूर्यवंशी, संतोष आलम, ऋषिकेश सोनवणे, विकास फडतरे, किरण राणे व विवेक शिंदे असी मंडळी आहेत. किल्ल्यांचे संवर्धन आणि युवा वर्गात किल्ल्यांप्रती आवड निर्माण होण्यासाठी मोहिमा आखल्या जात असल्याचे वैभव खापटे, प्रतीक जुन्नरकर यांनी सांगितले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Kannad Minor Boys Missing : शाळेत जातो म्हणत घराबाहेर पडले; कन्नडमधील तीन अल्पवयीन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता!

Dombivli Elections : कल्याण–डोंबिवली रणधुमाळीत मनसेचा प्रयोग; जैन समाजातील उमेदवार मैदानात!

Palghar News : ७/१२ वर खोट्या नोंदींचा आरोप; मोखाडा तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT