The liquor factory also starts in Lockdown 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्येही सुरू होतं दारूचं गुऱ्हाळ, सासू-सून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

राशीन : आखोणी (ता. कर्जत) शिवारात राशीन पोलिसांनी काल दुपारी गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकून चारशे लिटर कच्च्या दारूचे रसायन उद्‌ध्वस्त केले. पोलिसांनी सासू-सुनेस ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी पळून गेला.

आखोणी शिवारात काटेरी झुडपांच्या आडोशाला गावठी दारू काढली जात असल्याचे पोलिसांना समजले. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे, पांडुरंग वीर, संपत शिंदे, निशिगंधा भिसे यांच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकला. त्यात त्यांनी चारशे लिटर कच्ची दारू असलेले पिंप आणि त्याच्या बाजूला असलेली दारू गाळण्याची भट्टी उद्‌ध्वस्त केली.

यातील मुख्य आरोपी संतोष काळे पळून गेला, तर त्याची आई रुबिना आणि पत्नी मंदाकिनी या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या छाप्यात एक मोटरसायकल, वीजपंप, दहा लिटर दारू, नवसागर, सडका गूळ यांसह बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यसन करणाऱ्यांना दारू मिळत नाही. त्यामुळे काही लोकांनी हातभट्टीची दारू गाळायचा धंदा जोरात सुरू केला आहे. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही दारू मिळत नसल्याने या हातभट्टीच्या दारूला बरकत आली आहे. त्यातून हा धंदा करणारे गावोगाव फोफावले आहेत. पोलिस त्यांच्यावर पाळत ठेवून कारवाई करीत आहेत. मात्र, गावोगाव दारूच्या भट्ट्या चोरी-छुपके सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT