पश्चिम महाराष्ट्र

भावाला लागतेय झाेप कशी; बावन्नची शंभरला मिळतेय 'देशी'

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि.सातारा)  : "ज्यांच याड, त्याला ग्वाड' या शब्दप्रयोगाची प्रचिती ग्रामीण भागात सध्या प्रत्ययास येत आहे. "एकच प्याला'साठी आसुसलेल्या तळिरामांची अवस्था "लॉकडाऊन'मुळे अधिकच बिकट बनली आहे. त्यातच विदेशी मिळेना, देशीला मात्र दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. 

"लॉकडाऊन'मुळे रावापासून रंकापर्यंत प्रत्येकालाच कोणत्या अन्‌ कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरापासून खेड्यांपर्यंत हेच चित्र कायम आहे. "तळिराम'ही या परिस्थितीला अपवाद नाहीत. एरवी कुठेही गेले, तरी वास काढण्यात वाकबगार असणाऱ्या या मंडळींसमोर सध्या मोठेच प्रश्न उभे राहिले आहेत.

"लॉकडाऊन'मुळे महामार्गालगतचे सर्व बार बंद आहेत. "देशी'च्या दुकानांची अवस्थाही अशीच आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विदेशी मिळत नाही. देशी मात्र, छुप्या मार्गाने कुठेतरी उपलब्ध होते. अर्थात तिचा भाव पेलेनासा झाला आहे. "देशी'ची 52 रुपयांची बाटली सध्या 100 ते 150 रुपयांना विकली जात आहे. विदेशीबाबतही असाच प्रत्यय येताना दिसतो. तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांची परिस्थितीही याहून निराळी नाही. पानटपऱ्या बंद असल्यामुळे अशा शौकिनांची सध्या चांगलीच पंचाईत झालेली आहे. तरीही छुप्या मार्गाने का होईना ते मिळविण्याच्या प्रयत्नात ही मंडळी दिसत आहेत. 

पोलिसांची नजर 

सध्या महामार्गावर पोलिसांचा राबता मोठ्या प्रमाणात आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिस सध्या कसून चौकशी करत आहेत. त्यात मालवाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कडक नजर आहे. त्याच अनुषंगाने महामार्ग पोलिसांनी साेमवारी (ता.30) दुपारी महामार्गावर वाहने थांबवून तपासणी केली.

Lockdown : आता रे ! सरपंचांच्याच घरात घुसला बिबट्या...


श्रीराम नवमीला सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत

सायगाव : कोरोना विषाणूच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे आनेवाडी (ता. जावळी) येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिले. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी यात्रेत वार्षिक बैल बाजार समितीच्या वतीने रद्द करण्यात आला आहे. श्रीराम नवमीला होणारा भैरवनाथ देवाचा छबिना, तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना पंचायत समितीच्या वतीने देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी यात्रेसंबंधी देण्यात येणाऱ्या आदेशाचे ग्रामस्थांनी पालन करण्याचे आवाहन सरपंच शिवाजी गोरे, पोलिस पाटील किशोर फरांदे यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Pune PMC School: शालेय विद्यार्थ्यांना धुवायला लावले नगरसेविकेचे पाय; पुण्यात गुरुपौर्णिमेनिमित्त धक्कादायक प्रकार

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

SCROLL FOR NEXT