पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : खासदार संजयकाकांना मुख्यमंत्र्यांची ‘गॅरंटी’

सकाळवृत्तसेवा

सांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आणि मंगळवारी (ता. १९) रात्री पावणेअकरालाच वर्षा बंगल्यावर संजयकाकांची उमेदवारी निश्‍चित झाली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीची माहिती दिली. 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीची बैठक झाली. संजयकाकांच्या पाठीशी ताकद उभी करून पुन्हा एकदा ऐतिहासिक मताधिक्‍याने त्यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. संजयकाकांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

या घडामोडींवर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिक्कामोर्तब झाले. आमदारांसह भाजपचे नेते मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर हेही उपस्थित होते. अर्थातच, खासदार पाटील यांच्या गेल्या पाच वर्षांतील भूमिकांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. आमदारांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तर संजयकाकांबद्दलच्या संभ्रमावर बोट मात्र ठेवले.  विशेषतः त्यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या जवळीकीचा विधानसभा निवडणुकीत आम्हाला त्रास नको, अशा आशयाची तक्रार आधीच करण्यात आली होती. त्याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेत आता कामाला लागा, असे आदेश दिले. 

मंगळवारी झाली बैठक
मंगळवारी रात्री साडेनऊला बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वा तास वेळ दिला. जतमधील पाणीप्रश्‍नापासून विधानसभेच्या तयारीपर्यंत चर्चा  झाली. या काळात संजयकाकांची उमेदवारी आणि विधानसभेची तयारी या दोन्ही गोष्टींवर भर होता. मुख्यमंत्र्यांनी कोंडी टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. संजयकाकांचे काम नेटाने करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. मी आणि चंद्रकांतदादा तसा शब्द देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये वाद न होता संजयकाकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT